scorecardresearch

आमिर खानचा भाचा पत्नीपासून विभक्त झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट? व्हिडीओ व्हायरल

इमरान खान २०१९ मध्ये झाला आहे पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त

who is actress lekha washington, imran khan lekha washington, imran khan avantika malik, imran khan actor now, imran khan actor, actor imran khan movies, aamir khan news, इमरान खान, इमरान खान लेखा वाशिंगटन, इमरान खान अवंतिका मलिक, लेखा वॉशिंगटन
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून रातोरात स्टार झालेला अभिनेता इमरान खान मागच्या बऱ्याच वर्षांपासून चित्रपटांमध्ये दिसलेला नाही. इमरान खान हा आमिर खानचा भाचा आहे मात्र त्याला ‘जाने तू या जाने ना’नंतर कोणताही हिट चित्रपट देता आला नाही आणि त्याने २०१५ मध्ये अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. एकीकडे करिअरला लागलेली उतरती कळा आणि दुसरीकडे इमरानच्या खासगी आणि वैवाहिक आयुष्यातही बऱ्याच समस्या आल्या. २०१९ मध्ये इमरान खान पत्नी अवंतिकापासून वेगळा झाला. पण आता बऱ्याच काळानंतर तो पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी दिसला. पण यावेळी त्याच्या डेटिंगच्या चर्चा होताना दिसत आहेत.

इमरान खानला ५ फेब्रुवारीला सार्वजनिक ठिकाणी बऱ्याच काळानंतर स्पॉट करण्यात आलं. यावेळी त्याच्याबरोबर इतर काही लोकांसह अभिनेत्री लेखा वॉशिंगटनही होती. पण ज्या पद्धतीने इमरान आणि लेखा यांनी एकमेकांचा हात पकडला होता त्यावरून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नेटकऱ्यांच्या मते या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा- इमरान खानपासून विभक्त झाल्यानंतर अवंतिका मलिक पुन्हा प्रेमात? फोटो व्हायरल

कोण आहे लेखा वॉशिंगटन?

लेखा वॉशिंगटन ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय लेखा एक प्रोडक्ट डिझायनरही आहे. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात इंग्लिश चित्रपट ‘फ्रेम्ड’मधून केली होती. ज्यानंतर ती व्हिडीओ जॉकी झाली. तर १९९९ मध्ये तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. दरम्यानच्या काळात तिने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘युवा’, ‘मटरू की बिजली का मनडोला’ आणि ‘पीटर गया काम से’ या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे. विशेष म्हणजे ‘मटरू की बिजली का मनडोला’ या चित्रपटात इमरान खाननेही काम केलं आहे.

आणखी वाचा- प्रियांका चोप्राच्या ‘या’ गाण्यावर थिरकले आमिर खान आणि कार्तिक आर्यन; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले..

इमरान खानच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं तर त्याने जवळपास ८ वर्ष डेट केल्यानंतर अवंतिका मलिकशी लग्न केलं होतं. दोघांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०१४ मध्ये इमरान अवंतिका मुलगी इमाराचे आई-बाबा झाले. पण नंतर अवंतिका आणि इमरान यांच्यात वाद होऊ लागले आणि ते दोघंही २०१९ मध्ये विभक्त झाले. मात्र अद्याप त्यांनी कायदेशीर घटस्फोट घेतलेला नाही. दरम्यान अवंतिका मलिक सध्या साहिब सिंह लांबाला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 11:58 IST
ताज्या बातम्या