बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत सापडल्याचं दिसतंय. महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावलं आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएल २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगबाबत तमन्नाला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. या स्ट्रीमिंगमुळे वायकॉमचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. तिला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

तमन्ना भाटियाने फेअरप्लेचं प्रमोशन केलं होतं, त्यामुळे तिची या प्रकरणी चौकशी केली जाईल. तिला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे. फेअरप्लेच्या प्रमोशनसाठी तिच्याशी कोणी संपर्क साधला होता आणि त्यासाठी तिला किती पैसे मिळाले, यासंदर्भात तिची चौकशी केली जाणार आहे. ‘एएनआय’ने याबद्दल वृत्त दिलं आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

चित्रपटात चमकीला यांच्या जातीचा वारंवार उल्लेख, इम्तियाज अली म्हणाले, “त्यामुळेच त्यांनी आपला जीव गमावला, कारण…”

तमन्ना भाटियाआधी २३ एप्रिल रोजी अभिनेता संजय दत्तलाही या प्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे. पण, संजय सध्या मुंबईत नाही, त्यामुळे दिलेल्या तारखेला हजर राहू शकत नसल्याचं त्याने म्हटलं आहे. त्याने आपला जबाब नोंदवण्यासाठी तारीख आणि वेळ मागितली आहे.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वायकॉमने महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तपास केला जात असून त्याचसंदर्भात तमन्ना भाटिया आणि संजय दत्त यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी रॅपर बादशाहचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. फेअरप्लेवर बेकायदेशीरपणे आयपीएलचं स्ट्रीमिंग केल्याने वायकॉमचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जातंय.