Anupam Kher in Ayodhya: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. सगळीकडे भक्तीमय वातावरण आहे. दिग्गज राजकारणी, समाजकारणी, सिनेसृष्टीतील कलाकार आज अयोध्येत पोहोचत आहेत. सर्वसामान्य जनताही मोठ्या प्रमाणात अयोध्येला जात आहे. अशातच अभिनेते अनुपम खेरदेखील अयोध्येला पोहोचले आहेत.

अभिनेते अनुपम खेर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत आहेत. आज त्यांनी अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात जाऊन पूजा केली आणि दर्शन घेतले. त्यांचा या मंदिरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते हनुमानाचे दर्शन घेताना दिसत आहेत.

Navneet rana amaravati
“यावेळी मोदींना घरी…”, नवनीत राणांसमोर शेतकऱ्यांचा गोंधळ; म्हणाले, “तुम्हाला मत देऊन…”
BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”

Video: बिग बी, रणबीर-आलिया, विकी-कतरिना अन्…; राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी अयोध्येला रवाना

अनुपम खेर दर्शन घेताना त्यांच्याभोवती लोकांनी गर्दी केली होती. तिथे उपस्थित अनेकजण अनुपम खेर यांच्याबरोबर फोटो काढत होते. त्या गर्दीत अनुपम खेर यांनी हनुमानाचे दर्शन घेतले आणि तिथून बाहेर पडले. “प्रभू श्रीराम यांच्याजवळ जाण्याआधी हनुमानाचे दर्शन घेणं आवश्यक आहे. मी २१ हनुमान मंदिरांचा एक व्हिडीओ बनवत आहे. मी इथे तीन महिन्यांपूर्वीही आलो होतो. अयोध्येत सगळीकडे जय श्री रामचा जयघोष पाहायला मिळत आहे. आज श्रीरामाच्या भक्तीत जगभरातील हिंदू तल्लीन आहेत. पुन्हा दिवाळी आली आहे, ही दिवाळीच खरी दिवाळी आहे,” असं अनुपम खेर म्हणाले.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.