प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांचा ‘कडक सिंग’ हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अ‍ॅम्निशिया आजाराशी झगडत असलेल्या ए. के. श्रीवास्तव ऊर्फ कडक सिंग यांच्या आयुष्याची कहाणी दाखवली आहे. आर्थिक गुन्हे विभागाचे सहसंचालक असलेले कडक सिंग त्यांच्या भूतकाळात घडलेल्या घटनांच्या विळख्यात कसे अडकत जातात आणि आपल्या मोडकळीला आलेल्या कुटुंबाला कसे धरून ठेवतात? याभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री संजना सांघी हिचे कौतुक केले जाते आहे. ‘दिल बेचारा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या संजनाने त्याआधी ‘रॉकस्टार’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले होते. आतापर्यंत तिने तीन चित्रपट केले असून ‘कडक सिंग’ हा तिचा चौथा चित्रपट आहे. 

‘कडक सिंग’ या चित्रपटातील भूमिकेमुळे कौतुकाचा वर्षांव संजनावर होतो आहे. त्याबद्दल बोलताना तसं पाहायला गेलं तर हा चौथा चित्रपट असूनही प्रदर्शनाच्या दिवशी माझ्या मनात धाकधूक होती. पहिल्याच चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी जो ताण कलाकाराच्या मनात असतो तसाच काहीसा अनुभव मी ‘कडक सिंग’च्या प्रदर्शनाआधी घेतला. एकाअर्थी कलाकार कितीही मोठा झाला तरी आपलं काम लोकांना आवडेल ना.. त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना हे थोडंसं दडपण जे मनावर असतं ते कायम असायलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला आपल्या कामात सुधारणा करता येणार नाही असं आपलं मत असल्याचं संजनाने सांगितलं. ‘कडक सिंग’ हा थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे, मात्र त्याआधी या चित्रपटाचा खास प्रयोग गोवा येथे झालेल्या ५४ व्या इफ्फी महोत्सवात दाखवण्यात आला. या महोत्सवात आम्हा कलाकारांच्या कामाचं जे कौतुक झालं आहे त्यामुळे नाही म्हटलं तरी सुरुवातीची जी भीती होती तिची जागा अभिमानाने घेतली आहे. आम्ही चांगलं काम केलं याची पावतीही मिळाली आणि त्याच वेळी पुढेही उत्तम काम करत राहण्याची जबाबदारी वाढली असल्याची जाणीव झाल्याचं तिने सांगितलं.

Swayam Parampje murder of construction businessman in Thane thane news
मैत्रिणीचे ‘ते’ छायाचित्र मोबाईलमधून डिलीट केले नाही म्हणून बांधकाम व्यवसायिकाची हत्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The fake SBI branch was opened in Chhattisgarh's Sakti district
SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?
uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
histrionic personality disorder
स्वभाव – विभाव : लक्ष वेधून घेण्याची धडपड
pedro almodovar loksatta latest marathi news
बुकबातमी: पेद्रो अल्मोदोव्हर कथा लिहितो….
What is pm vishwakarma yojna
PM Vishwakarma Scheme : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय? अर्ज भरण्याची प्रक्रिया, कागदपत्रे काय हवीत? जाणून घ्या…
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?

हेही वाचा >>> रश्मिका मंदानाने ‘अ‍ॅनिमल’च्या सेटवर कशी वागणूक दिली? तृप्ती डिमरी म्हणाली, “ती खूप…”

या चित्रपटात संजनाने अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर बरंचसं काम केलं आहे. शिवाय, या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केलं आहे. या दोघांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप काही शिकवून गेल्याचं संजना सांगते. ‘या चित्रपटात गुन्हेगारी विश्वाची कथा आणि कौटुंबिक नातेसंबंध, जबाबदाऱ्या या दोन गोष्टी समांतर पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. पंकज त्रिपाठी यांनी माझ्या वडिलांची भूमिका केली आहे. एक कलाकार आणि व्यक्ती म्हणूनही मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं’. त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हीच मुळात स्वप्नवत वाटणारी गोष्ट आहे. त्यांच्यासोबत अभिनय करायला मिळणं म्हणजे अभिनयात पीएचडी करता येण्यासारखं आहे. त्याचं कारण म्हणजे पंकज त्रिपाठी अगदी सहजपणे त्यांची भूमिका करत आहेत असं वाटतं, पण त्यामागे त्यांचा गहन अभ्यास असतो. त्यांच्याबरोबर काम करत असलेल्या कलाकाराला ते समजून घेतात, काही चुकल्यास सावरूनही घेतात, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करता करताच अनेक गोष्टी शिकून घेता येतात, असं तिने सांगितलं.

तर दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्याबरोबर काम करताना आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन वाढतो. ते मजा-मस्ती करता करता खूप काही शिकवून जातात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं ही मोठी गोष्ट असल्याचं तिने सांगितलं. कारकीर्दीच्या सुरुवातीला अशा आव्हानात्मक भूमिका मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असं सांगतानाच अशा प्रकारच्या भूमिका साकारायला आवडत असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवेश दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्यामुळे कसा झाला याचाही किस्सा संजनाने सांगितला. ‘मी लहानपणापासून कथक शिकते आहे. मी १३ वर्षांची असताना दिग्दर्शक इम्तियाज अली आमच्या शाळेत आले होते. ‘रॉकस्टार’ चित्रपटासाठी कलाकारांची निवड सुरू होती. त्यांनी या चित्रपटातील मॅन्डी या व्यक्तिरेखेसाठी माझी निवड केली गेली. त्या चित्रपटात भूमिका केल्यानंतर पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात उतरण्याचा माझा निर्णय पक्का झाला. मी आधी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर अभिनयासाठी मुंबई गाठली’. मुंबईबाहेरील कलाकाराला इथे येऊन राहणं आणि काम शोधणं या दोन्ही गोष्टी अवघड जातात. संजनालाही त्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं. मी दिल्लीत लहानाची मोठी झाले आहे, त्यामुळे कामासाठी पूर्णपणे नव्या शहरात येणं हा वेगळाच अनुभव असतो, पण या शहराने मला फार कमी वेळात आपलंसं करून घेतलं, असं तिने सांगितलं. 

‘ हिंदीत ‘वाळवी’ करायला आवडेल’

मराठी चित्रपटात काम करायची संधी मिळाली तर नक्की आवडेल, असं संजना म्हणते. कलेला कोणत्याही भाषेचं बंधन असू शकत नाही या मतावर ती ठाम आहे. कोणतीही नवी भाषा शिकून घेणं, आत्मसात करणं मला जमतं. त्यामुळे भविष्यात मराठी चित्रपटात काम करायला नक्की आवडेल, असं तिने सांगितलं. माझ्या बाबांना प्रत्येक भाषेचे चित्रपट पाहायला आवडतात. त्यांनी खूप मराठी चित्रपट पहिले आहेत, त्यांच्यामुळे मलादेखील मराठी चित्रपट पाहण्याची सवय लागली. मला परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केलेला ‘वाळवी’ हा चित्रपट आवडला. त्यातील स्वप्निल जोशी आणि शिवानी सुर्वे या दोघांचे काम मला खूप आवडले. जर ‘वाळवी’ हा चित्रपट हिंदीतून पुन्हा करणार असतील तर मला नक्की त्यात काम करायला आवडेल, असंही तिने सांगितलं.