scorecardresearch

Premium

खिलाडी कुमार बनणार ‘Psycho’; अक्षयच्या आगामी चित्रपटाची चर्चा, अभिनेता दिसणार वेगळ्याच रूपात

२०२४ च्या सुरुवातीला याचं चित्रीकरण सुरू होणार असून अक्षय कुमार स्टाइलमध्ये म्हणजेच ४० दिवसांत याचं चित्रीकरण पूर्ण होणार असल्याची चर्चा आहे

akshay-kumar-new movie
फोटो : इंडियन एक्सप्रेस

गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारची जादू फारशी पाहायला मिळत नाहीये. ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट सोडला तर गेल्या काही वर्षातील अक्षयचे बरेचसे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. नुकताच प्रदर्शित झालेला ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. अशातच आता अक्षयच्या आगामी चित्रपटांची चर्चा होत आहे. त्यापैकी त्याचा ‘खेल खेल में’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

आता याबरोबरच अक्षय कुमारच्या आणखी एका चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाचं नाव ‘psycho’ असेल अशी माहिती सध्या समोर येत आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या रीपोर्टनुसार रोहित शेट्टी लवकरच पुढील चित्रपटाची घोषणा करणार आहे, शिवाय हा असा पहिला चित्रपट असणार आहे जो रोहित शेट्टी खुद्द दिग्दर्शित करणार नाहीयेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘जेहेर’, ‘आवारापन’, ‘आशिकी २’सारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक मोहित सूरी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
Gautami Patil First Time Revels Real Name Chatting With Fan Gautami Patil Lavani Video To Surname and Leaked Video Controversy
गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? चाहतीशी गप्पा मारताना स्वतःचं केला खुलासा.. आडनावावरूनही झाला होता वाद!
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…

आणखी वाचा : आयोध्येच्या भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याबद्दल अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “मला अभिमान आहे…”

‘सायको’ या चित्रपटात अक्षय कुमार एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. एका विक्षिप्त माणसाची भूमिका अक्षय निभावणार आहे. २०२४ च्या सुरुवातीला याचं चित्रीकरण सुरू होणार असून अक्षय कुमार स्टाइलमध्ये म्हणजेच ४० दिवसांत याचं चित्रीकरण पूर्ण होणार असल्याची चर्चा आहे. लवकरच या चित्रपटाची तयारी सुरू होणार आहे.

अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच याबद्दल माहिती समोर येईल अशी शक्यता आहे. याबरोबरच अक्षय कुमार ‘वेलकम ३’, ‘जॉली एलएलबी ३’, ‘हेरा फेरी ३’, ‘हाऊसफूल ५’, ‘बड़े मियां छोटे मियां’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. याबरोबरच अक्षयच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाचीही चांगलीच हवा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar upcoming film psycho to be directed by mohit suri avn

First published on: 28-10-2023 at 14:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×