पुढील वर्षी म्हणजेच २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत आणि इतरही मान्यवर या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. नुकतंच या सोहळ्याविषयी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी केलेलं वक्तव्य समोर आलं आहे.

अनुपम खेर ही या चित्रपटसृष्टीतील पहिली व्यक्ति आहे ज्यांनी त्याठिकाणी जाऊन प्रथम प्रार्थना केली आहे. याविषयी मीडियाशी संवाद साधताना अनुपम खेर म्हणाले, “२२ जानेवारी २०२४ या ऐतिहासिक दिवसाची सगळेच आतुरतेने वाट पहात आहेत. अखेर प्रभू श्रीराम यांचं मंदिर लोकांसाठी खुलं केलं जाणार आहे. हिंदूंनी यासाठी कायदेशीर मार्गाने एक मोठा लढा दिला आहे.”

Special court order BJP MP Pragya Singh
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित राहा, साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष न्यायालयाचे आदेश
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!

आणखी वाचा : घटस्फोटानंतर झालेल्या ‘गॉसिप’बद्दल सलील कुलकर्णींनी प्रथमच केलं भाष्य; म्हणाले, “ही वृत्ती…”

पुढे अनुपम खेर म्हणाले, “या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे की या चित्रपटसृष्टीतील मी असा पहिला कलाकार आहे ज्याला त्या मंदिरात प्रार्थना करायची संधी मिळाली. मला उद्घाटनसोहळ्याला निमंत्रण असो किंवा नसो मी त्यादिवशी तिथे जाणार हे नक्की.” काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतनेसुद्धा या मंदिराला भेट दिली होती. ‘तेजस’च्या प्रदर्शनाआधीच कंगनाने राम मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले होते.

१६ जानेवारीपासूनच या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार असून २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा ऐतिहासिक निर्णय दिला व त्यानंतर केंद्र सरकारने याठिकाणी भव्य राम मंदिर उभरायचा निर्णय घेतला. तब्बल ४ वर्षांनी आता हे भव्य राम मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे.