scorecardresearch

Premium

Video: ११ महिन्यांनंतर आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लेकीची पहिली झलक, पाहा राहाचा व्हिडीओ

आलिया आणि रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

alia bhatt and ranbir kapoor daughter raha v
आलिया आणि रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. दोघांचे व्हिडीओ, फोटो हे सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघं आई-बाबा झाले. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला, जिचं नाव राहा असं आहे. पुढच्या महिन्यात राहाला एक वर्ष पूर्ण होतील. तरीही अजूनपर्यंत आलिया आणि रणबीरने राहाचा चेहरा उघड केला नाही. पण सध्या राहाचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरुप परतली मायदेशी; व्हिडीओ आला समोर

Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला
mutual fund analysis, Invesco India Large Cap Fund, investment
Money Mantra : फंड विश्लेषण – इव्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड
Rohit Sharma angry video in IND vs ENG 3rd test in rajkot
IND vs ENG 3rd Test : सरफराजच्या धावबादनंतर रोहित शर्मा जडेजावर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर आलिया आणि रणबीरच्या लेकीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, आलिया लेकीला घेऊन जाताना दिसत आहे. पण व्हिडीओमध्ये राहाचा चेहरा ब्लर करण्यात आला आहे. सध्या राहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम साक्षी गांधी लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा प्रोमो

हेही वाचा – “माझी मुलगी सुरक्षित, ती भारतात…”; इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाच्या आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

राहाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीलं आहे की, मुलीचा चेहरा ब्लर ठेऊन प्रायव्हसीची काळजी घेतील…छान. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘क्यूट’ असं लिहीलं आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं आहे की, एवढी मोठी झाली.

हेही वाचा – अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

दरम्यान, आलिया-रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच आलिया ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तसेच रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर पाहायला मिळणार आहे. तसेच आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा एकत्र ‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये झळकणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alia bhatt and ranbir kapoor daughter raha video goes viral on social media pps

First published on: 08-10-2023 at 18:35 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×