अनुराग कश्यप हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. आपल्या हटके शैलीसाठी आणि नव्या प्रतिभावान कलाकारांना काम देण्यासाठी तो ओळखला जातो. त्याच्या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार नसले तरी चित्रपट हिट होतात.

नुकत्याच आलेल्या ‘हड्डी’ या चित्रपटात अनुरागने हटके भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त तो माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला दिसत आहे. पूजा तलवारच्या यूट्यूब चॅनलसाठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान अनुरागने बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं आहे. भारतीय हे प्रचंड ढोंगी आहेत असं वक्तव्यही त्याने या मुलाखतीमध्ये केलं आहे. याबरोबरच सेक्सकडे आपली लोक ज्या दृष्टिकोनातून पाहतात त्याबद्दलही त्याने भाष्य केलं आहे.

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!

आणखी वाचा : जितेंद्र आव्हाडांसह बघा शाहरुखचा ‘जवान’; मुंब्रा व कळव्यातील तरूणांना मोफत तिकीटांचे वाटप

या विषयावर बोलताना अनुरागने आयुष्मान खुरानाच्या ‘चंदीगढ करे आशिकी’ या चित्रपटाचा संदर्भ दिला. अनुराग म्हणाला, “प्रेक्षकांनी ‘चंदीगढ करे आशिकी’कडे पाठ फिरवली. तो पाहताना बरेच प्रेक्षक अवघडले. मला तो चित्रपट प्रचंड आवडला, वाणी कपूरने त्यात आजवरचं उत्तम काम केलं आहे. लोकांना ते आवडलं नाही. मनमर्जियांच्या बाबतीतही लोक असेच व्यक्त झाले. आपण सेक्स या शब्दाचा एवढा बाऊ केला आहे की त्याबद्दलचं संभाषण आपण टाळतो. हा तीन अक्षरी शब्द बऱ्याच लोकांना खटकतो.”

याबरोबरच भूमी पेडणेकरच्या आगामी चित्रपटाबद्दलही अनुराग बोलला. तो म्हणाला, “आता लवकरच ‘थॅंक यु फॉर कमिंग’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर अन् कॅम्पेन मला प्रचंड आवडलं आहे. लोक हा चित्रपट नक्की पाहतील पण एकट्यानेच जाऊन पाहतील. आपण सगळेच ढोंगी आहोत आणि कायम ढोंगीच राहणार.”