scorecardresearch

राहुल गांधी संदर्भातील ‘त्या’ ट्वीटवरून चित्रपट निर्मात्याची स्वरा भास्करवर टीका; अर्बन नक्षली उल्लेख करत म्हणाले, “अमेठीचा आवाज…”

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर केलेल्या ट्वीटवर चित्रपट निर्मात्याने निशाणा साधला आहे.

swara bhaskar and rahul gandhi
स्वरा भास्कर आणि राहूल गांधी (संग्रहित छायाचित्र)

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने याबाबत ट्वीट केलं आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याचं एएनआयचं ट्वीट स्वराने तिच्या अकाऊंटवरुन रिट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. स्वराच्या या ट्वीटवर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी निशाणा साधला आहे.

हेही वाचा- “सरकारने ठरवलं तर टॅक्स…” प्रसाद ओकने पत्नीबरोबर शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

स्वरा भास्करने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, “नमस्कार जगा! लोकशाहीची आई आपल्याच मुलाची हत्या करत आहे. याआधी स्वराने तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “एकेकाळी रशिया, तुर्की इत्यादींबाबत आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या वाचल्या होत्या. आज भारत अशा देशांपैकी एक आहे जिथे लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकार आणि त्यांची सरकारी यंत्रणा लोकशाहीलाच नष्ट करत आहे”.

लोकशाहीवरील स्वरा यांचे ट्विट शेअर करत अशोक पंडित यांनी लिहिले, “नमस्कार अर्बन नक्षलवादी, लुटारू आणि गैरवर्तन करणार्‍यांना नरेंद्र मोदींच्या नव्या भारतात जागा नाही.” या ट्विटवर अनेक यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा- पुरस्कार स्वीकारल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियाराचं केलं कौतुक; अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत

याशिवाय अशोक पंडित यांनीही त्यांच्या ट्विटवर राहुल गांधींवर ताशेरे ओढले आहेत. राहुल गांधी यांनी संसद सदस्यत्व सोडल्यानंतर ट्विट केले होते. ज्यात त्यांनी लिहिले की, “मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.” हे शेअर करताना अशोक पंडित यांनी लिहिले, “अनेक वर्षे राज्य करूनही अमेठी भारताचा आवाज बनू शकले नाही. तुला बाबा जमणार नाही.

नेमकं प्रकरण काय?

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक वक्तव्य केलं होतं. कर्नाटकातील एक सभेत “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्या आडनावांमध्ये समान धागा काय आहे? सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का?” असं राहुल गांधी म्हणाले होते. यासंदर्भात गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी गुरुवारी(२३ मार्च) न्यायालयाने राहुल गांधींना दोषी सिद्ध करून दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 17:53 IST

संबंधित बातम्या