टॉप १० भारतीय अभिनेत्यांच्या यादीत सलमान खानचं नाव सामील आहे. सलमान खान गेली अनेक वर्षं विविध चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्याला त्याच्या चाहत्यांचं नेहमीच भरभरून प्रेम मिळत असतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सलमान खानला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सलमान खान कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आहे. यामुळेच सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता तो कुठेही जात असताना त्याच्याबरोबर त्याचा अंगरक्षक शेरा तर असतोच पण त्याचबरोबर बंदूक घेऊन आणखीही लोक असतात. सलमान खानसाठी इतकी तगडी सुरक्षा असूनही त्याच्या एका चाहत्याने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला.

man jumps into lake after being fed up with expenses of daughters treatment
मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…
mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द

आणखी वाचा : दिलीप जोशींनी सलमान खानबरोबर रूम शेअर केली होती तेव्हा ‘असा’ वागायचा ‘भाईजान’, आठवण शेअर करत म्हणाले…

सलमान खान नुकताच मुंबई विमानतळावरून दुसऱ्या शहरामध्ये जाताना दिसला. विमानतळावर तो येताच त्याच्यासह बाजूला सुरक्षारक्षक होते. इतक्यात त्याचा एक चाहता त्याच्याकडे धावत येताना त्याला दिसला. त्या छोट्या मुलाला बघताच सलमान खान जागेवरच थांबला. लहान मुलगा सलमानकडे आला आणि त्याने सलमानला मिठी मारली. सलमाननेही त्याला खूप प्रेमाने जवळ घेतलं.

हेही वाचा : “मला सलमान खानशी लग्न करायचंय…” प्राजक्ता माळीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाली…

हा व्हिडीओ पाहून सर्व जण त्याच्या या कृतीचं कौतुक करत आहेत. सलमान खानचा हा प्रेमळ स्वभाव आणि चाहत्यांबद्दल त्याला वाटणारं प्रेम नेटकऱ्यांना चांगलंच भावलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत आता चाहते सलमानचं कौतुक करत आहेत.