बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. नुकत्याच त्या करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसल्या आहेत. जया बच्चन यांनी १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुड्डी’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदापर्ण केलं होतं. या चित्रपटात त्यांच्याबरोबर धर्मेद्र यांची मुख्य भूमिका होती. तेव्हापासून धर्मेंद्र जया बच्चन यांना एका विशिष्ट नावाने हाक मारतात. खुद्द अभिनेत्रीने याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- काजोलने बॉलीवूड अभिनेत्रींच्या समान वेतनाबाबत मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “शाहरुख खानच्या ‘पठाण’सारखी…”

एका मुलाखतीत जया बच्चन यांनी धर्मेद्र यांच्यावर त्यांच क्रश असल्याचेही सांगितलं होतं. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या पत्रकार परिषदेत धर्मेंद्र यांनी जया बच्चन यांच्याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. धर्मेद्र म्हणाले, मी आजही जया यांना गुड्डी नावाने हाक मारतो. आमच्या चित्रपटाला ५२ वर्ष झाले असले तरी आजही त्या माझ्यासाठी गुड्डीच आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो मला खूप छान वाटतं.”

हेही वाचा- आदित्य रॉय कपूर आणि मुलगी अनन्याच्या डेटिंगच्या चर्चांवर चंकी पांडेने सोडलं मौन; म्हणाले “जेव्हा तुम्ही…”

करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण ७३.६२ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटातून करण जोहरने तब्बल ८ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शक म्हणून कमबॅक केलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये आलियाने बंगाली मुलीची तर रणवीरने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे. तसेच धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, क्षिती जोग यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.