scorecardresearch

Premium

ओठांना लिपस्टिक, स्कर्ट अन्…; ‘ड्रीम गर्ल २’मधील आयुष्यमान खुरानाचा लूक प्रदर्शित

या पोस्टरमुळे चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुक्ता वाढली आहे.

ayushman khurana
‘ड्रीम गर्ल २’मधील आयुष्यमान खुरानाचा लूक प्रदर्शित

आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. आयुष्मान खुरानाने साकारलेली ‘पूजा’ची व्यक्तिरेखा खूप गाजली. आता आयुष्मान ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत ‘ड्रीम गर्ल २’ची घोषणा केली होती. आता नुकताच या चित्रपटातील आयुष्मान खुरानाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा- “घरी गाडी असून ऑडिशनला बसने जायचो, कारण…”, विकी कौशलने केला खुलासा; म्हणाला, “आई-वडिलांनी…”

Tania Sing Ends her Life
लोकप्रिय मॉडेलची आत्महत्या, शेवटच्या कॉलमुळे IPL मधला प्रसिद्ध खेळाडू अडचणीत
vikrant-massey-family
१७ व्या वर्षी भावाने स्वीकारला इस्लाम अन् वडील चर्चमध्ये…; विक्रांत मेस्सीने कुटुंबियांबद्दल केला मोठा खुलासा
razakar-trailer
“ओम शब्द आणि भगवा रंग…”, हैदराबाद नरसंहारावर बेतलेल्या ‘रजाकार’ चित्रपटाचा अस्वस्थ करणारा ट्रेलर प्रदर्शित
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’

आयुष्यमानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने त्याने या ड्रीम गर्ल २’मधील आपला लूक प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये आयुष्यमान आरश्यात बघून लिप्स्टिक लावताना दिसत आहे. दर दुसऱ्या बाजूला त्याचा डबल रोल पूजा दिसत आहे तिही लिप्स्टीक लावताना दिसत आहे. या पोस्टरमुळे चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुक्ता वाढली आहे.

या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. या पोस्टरवर आयुष्यमानच्या पत्नीनेही कमेंट केली आहे. पोस्टखाली तिने दोन हार्ट आय इमोजी शेअर केले आहेत. तसेच चाहते आयुष्यमानच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘मेक-अप, स्कर्ट आणि विगमध्ये माणूस इतका सुंदर कसा दिसतो.’ आणखी एका युजरने ‘मजा आ गया’ अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा- Oppenheimer: सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियाराबरोबर पाहिला ‘ओपनहायमर’ चित्रपट अन् दिग्दर्शकाविषयी म्हणाला…

चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानाबरोबर अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत तर एकता कपूर या चित्रपटाची निर्माती आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dream girl 2 poster release ayushmann khurrana look viral dpj

First published on: 25-07-2023 at 18:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×