बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिली होती. त्यानंतर रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकीचा मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशातच या संपूर्ण प्रकरणावर सलमानच्या प्रतिक्रियेबद्दल एका जवळच्या मित्राने माहिती दिली आहे.

ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर ढसाढसा रडलेली वनिता खरात; म्हणाली, “तो गेला तेव्हा…”

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, सलमानच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, “या गोष्टींचा अभिनेत्याला फरक पडत नाही. सलमान ही धमकी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे. तसेच पालकांना त्रास होऊ नये म्हणून कदाचित तो तसं भासवतोय. एकत्र राहणाऱ्या या कुटुंबाची खास गोष्ट म्हणजे ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. सलमानचे वडील सलीम खानही खूप शांत दिसत आहेत. पण ते रात्री झोपू शकत नाहीयेत,” अशी माहिती त्या व्यक्तीने दिली आहे.

भांडण नाही, मतभेद नाही, तरीही गेली ३४ वर्षे पतीपासून वेगळ्या का राहतात अल्का याज्ञिक? जाणून घ्या

जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, “सलमानला वाटतं की धमकी देणाऱ्या त्या व्यक्तीकडे जास्त लक्ष दिलं जातंय. भीतीपोटी सुरक्षा जितकी वाढवली जाईल, तितका त्याचा हेतू यशस्वी होईल. तसेच सलमानला नेहमीच मोकळेपणाने जगायला आवडतं. जेव्हा जे व्हायचं असतं तेव्हा ते होईल. मात्र कौटुंबिक दबावामुळे त्याने आपले सर्व प्लॅन्स कॅन्सल केले आहेत. पण तरीही ईदला रिलीज होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी चित्रपटाच्या कामाच्या शेड्यूलमध्ये कोणताही बदल झालेला नाही.”

स्वरा भास्करने रिसेप्शनमध्ये परिधान केला पाकिस्तानी लेहेंगा, फोटो शेअर करत म्हणाली, “सीमेपलीकडून…”

दरम्यान, सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला शनिवारी धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. मेल पाठवणाऱ्या तरुणाचं नाव रोहित गर्ग असल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.