scorecardresearch

Premium

‘फायटर’मधील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

हृतिक रोशनने नुकतंच सोशल मीडियावर ‘फायटर’मधील हा लूक शेअर केला आहे

hrithik-roshan-first-look reveld from-film-fighter
'फायटर' मधील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक आला समोर

हृतिक रोशन बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. आतापर्यंत हृतिकने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणूनही त्याला ओळखले जाते. क्रिश, वॉर यांसारख्या अ‍ॅक्शन चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. आता लवकरच हृतिकचा ‘फायटर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील हृतिक फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.

हेही वाचा- Dunki Trailer: “इंग्रजांना हिंदी येत होतं का?” गंभीर मुद्द्यावर विनोदी पद्धतीने भाष्य; शाहरुख खानच्या ‘डंकी’चा ट्रेलर प्रदर्शित

chamkila-movie-release-date
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार?
Best new web series and movies Web series sequels on OTT Entertainment news amy 95
ओटीटीवर वर्ष सिक्वेलचे!
PM Modi PM Modi on Article 370on Article 370
“हा चित्रपट कसा आहे याबद्दल…”, पंतप्रधान मोदींनी जम्मूमध्ये केला ‘आर्टिकल ३७०’ चा उल्लेख; यामी गौतम म्हणाली…
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’

हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या ‘फायटर’ चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. हृतिक एअरफोर्स पायलटच्या गणवेशात दिसत आहे. या चित्रपटात हृतिक स्क्वॉड्रन लीडर ‘शमशेर पठानिया’ची भूमिका साकारणार असून, त्याला ‘पॅटी’ नावाने संबोधले जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच हृतिकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत ‘फायटर’ चित्रपटाची पहिली झलक आणि रिलीज डेट जाहीर केली होती. या फोटोमध्ये हृतिक एअरफोर्स फायटरच्या गणवेशात दिसून आला होता. तसेच या फोटोमध्ये हृतिक फायटर प्लेनला हात लावून उभा असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा- रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ मंडे टेस्टमध्येही पास; चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, लवकरच पार करणार ३०० कोटींचा टप्पा

मिळालेल्या माहितीनुसार ‘फायटर’ चित्रपटाचे बजेट जवळपास २५० कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात हृतिक रोशनबरोबर दीपिका पदुकोण, अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hrithik roshan first look revealed from film fighter dpj

First published on: 05-12-2023 at 12:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×