बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात जान्हवीबरोबर राजकुमार राव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याने तिच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्यामुळे अनेकदा तिच्या लग्नाबाबत अफवादेखील पसरल्या आहेत. जान्हवीने नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत जान्हवीने तिच्या आणि शिखरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे आणि लग्नाच्या अफवांबद्दल मौन सोडलं आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: साक्षीला होणार तुरुंगवास? अर्जुन-सायलीच्या मदतीने अखेर शिवानी देणार खरी साक्ष; पाहा प्रोमो

जान्हवी कपूर म्हणाली, “मी नुकतंच कुठेतरी वाचलं की काही जण म्हणतायत की मी कोणत्या तरी रिलेशनशिपची पुष्टी दिली आहे आणि आता माझं लग्न होणार आहे. लोकं दोन-तीन आर्टिकल मिक्स करतात आणि मी लग्न करणार आहे हे जाहीर करून टाकतात. ते माझं लग्न याच आठवड्यात लावतायत आणि या सगळ्याला माझी परवानगी नाही”, असं मजेशीररित्या जान्हवी म्हणाली. “मला सध्या फक्त कामाकडे लक्ष केंद्रित करायचंय”, असंही जान्हवी म्हणाली.

या अफवांबाबत बोलण्याची जान्हवीची ही काही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामच्या एका पापाराझी पेजवर अफवा पसरली होती की, जान्हवी सोनेरी रंगाची साडी नेसून तिरुपती मंदिरात शिखरबरोबर लग्न करणार आहे. या अफवेवर जान्हवीने मजेशीर उत्तर दिलं. जान्हवी म्हणाली, “म्हणजे लोकांचं आपलं काहीही सुरू असतं.”

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

जान्हवीने काही महिन्यांपूर्वी ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात बहीण खुशीबरोबर हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने वैयक्तिक आयुष्याबद्दलही खुलासा केला होता. या दरम्यान जान्हवीने शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिली होती.

हेही वाचा… पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणच्या लग्नाला तीन महिने पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “मिसेस झाल्यानंतर…”

दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जान्हवीचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अभिनेत्री ‘देवरा: भाग १’ या चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जान्हवीने ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे.