अभिनेत्री जान्हवी कपूर व राजकुमार राव यांचा ‘मिस्टर अँड मिसेज माही’ हा चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी व राजकुमार दोघेही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला जोडीदाराचा फोन चेक करण्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने उत्तर दिलं आहे.

जान्हवी आता शिखरबद्दल विचारलेल्या प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरं देत असते. एका मुलाखतीत जान्हवीला विचारण्यात आलं की ती तिच्या बॉयफ्रेंडचा फोन तपासते का? त्यावर अभिनेत्रीने काय उत्तर दिलं ते पाहुयात. ‘गर्लफ्रेंड्सना त्यांच्या बॉयफ्रेंडचे फोन तपासण्याची परवानगी असावी का?’ असं विचारल्या जान्हवी म्हणाली, “मला माहित आहे की हा रेड फ्लॅग आहे, पण मी त्याचा फोन तपासत असते.”

“मी १५-१६ वर्षांची होते, तेव्हापासून शिखर…”, बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणाली जान्हवी कपूर? जाणून घ्या

याच मुलाखतीत प्रेक्षकांमधून कोणीतरी जान्हवीला विचारलं की, ‘एखाद्या बॉयफ्रेंडला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन तपासण्याची परवानगी असावी का?’ यावर अभिनेत्री म्हणाली, “नाही!” मग बॉयफ्रेंड्सना फोन तपासण्याची परवानगी का असू नये, असं विचारलं असता जान्हवी म्हणाली, “का, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवत नाही का?” जान्हवीचं हे उत्तर ऐकून सगळे हसायला लागले. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

दरम्यान, जान्हवीला ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशन दरम्यान तिच्या सपोर्ट सिस्टिमबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तिने शिखरचं नाव घेतलं. खूप लहान असल्यापासून शिखर आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि आपण एकमेकांची स्वप्नं पूर्ण करण्यास मदत करतो, असं जान्हवी म्हणाली. “मी १५-१६ वर्षांची होते, तेव्हापासून शिखर माझ्या आयुष्यात आहे. मला वाटतं की माझी स्वप्नं नेहमीच त्याची स्वप्नं होती आणि त्याची स्वप्नं नेहमीच माझी स्वप्नं होती. आम्ही एकमेकांची सपोर्ट सिस्टिम आहोत, जणू आम्ही एकमेकांना मोठं केलं आहे,” असं जान्हवी म्हणाली.

जया बच्चन यांना ‘या’ नावाने हाक मारायच्या रेखा; एकाच इमारतीत राहायच्या दोघी, अमिताभ अन् रेखांची पहिली भेट…

बोनी कपूर व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर शिखर पहारियासह रिलेशनशिपमध्ये आहे. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे पहारिया व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. जान्हवीने काही महिन्यांपूर्वीच शिखरबरोबरच्या नात्याची कबुली दिली. त्यानंतर ती खूपदा शिखरवरचं प्रेम व्यक्त करताना दिसली. कधी ती त्याच्या नावाचा नेकलेस घालून कार्यक्रमांना जाते, तर कधी त्याच्याबरोबर देव दर्शनाला जाते. काही दिवसांपूर्वी जान्हवी शिखरच्या आईबरोबर सिद्धीविनायकाच्या दर्शनाला अनवाणी पायाने चालत गेली होती.