कंगना रणौत नेहमीच तिच्या चित्रपटांतील भूमिकांबरोबरच तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नेहमीच ती बिनधास्तपणे आपलं मत मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वीच नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलियाच्या घराचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये नवाझुद्दीनची पत्नी त्याच्यावर आरोप लावताना दिसत होती. यावर कंगनाने आपलं मत मांडत नवाझुद्दीनचं समर्थन केलं होतं. आता ती प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौलींचं समर्थन केल्याने चर्चेत आली आहे.

कंगनाचं बिनधास्त आणि बोल्ड अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अलिकडेच राजामौली यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी धर्म आणि हिंदू धर्मग्रंथांवर स्वतःचं मत मांडलं होतं. या मुलाखतीत ते म्हणाले, “एक काळ होता जेव्हा मी खूपच जास्त धार्मिक होतो. पण आता असं नसलं तरीही मी पूर्णतः नास्तिकही नाही.” त्यांची ही मुलाखत प्रसिद्ध करताना वेब साइटने, ‘भारतीय वादग्रस्त ग्लोबल ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’च्या मागची व्यक्ती’ असा त्यांचा उल्लेख केला.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र

आणखी वाचा- उद्धव ठाकरेंनी शिवसेना गमावली अन् कंगना रणौतचं ‘ते’ जुनं ट्वीट व्हायरल; अभिनेत्री नव्याने शेअर करत म्हणाली…

एस एस राजामौली यांच्यासाठी वादग्रस्त हा शब्द वापरणं कंगनाला आवडलं नाही आणि तिने यावर आक्षेप घेत एक ट्वीट केलं आहे. कंगनाने लिहिलं, “मला माहीत आहे त्यांनी या देशावर प्रेम करण्यासाठी काय वाद केले आहेत. क्षेत्रीय चित्रपट जगासमोर आणले. ते देशाप्रती समर्पित आहेत. ही त्यांची चूक आहे म्हणून हे लोक त्यांना वादग्रस्त म्हणत आहेत. पण एक व्यक्ती म्हणून राजामौली यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची या लोकांची हिंमतच कशी होते. तुम्हा सर्वांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे.”

आणखी वाचा- “मूर्ती पूजा इस्लाममध्ये…”, महाशिवरात्रीला मंदिरातील फोटो शेअर केल्याने सारा अली खान ट्रोल

कंगना पुढे लिहिते, “या जगाने कोणत्या गोष्टीसाठी त्यांच्यावर वादग्रस्त ही मोहर लावली आहे? त्यांनी कोणता असा वाद केला आहे? त्यांनी आपली हरवलेली सभ्यता परत आणण्यासाठी ‘बाहुबली’सारखा चित्रपट तयार केला की त्यांनी राष्ट्रवादावर आधारित ‘आरआरआर’ बनवला ही त्यांची चूक आहे? की मग त्यांनी आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवर पारंपरिक वेशभूषा केली ही त्यांची चूक आहे? त्यांनी नेमका कोणता वाद केला? मला कृपया सांगा.”