नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या काही वक्तव्यांची जोरदार चर्चा आहे. त्यांनी फेमिनिझम ही फालतू गोष्ट असल्याचं विधान केलं. तसेच जेव्हा पुरुष गरोदर होतील, तेव्हाच खरी स्त्री-पुरुष समानता येईल असंही त्यांनी म्हटलं होतं. नीना यांनी केलेल्या या वक्तव्यांवर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. तिने नीना यांच्या फालतू फेमिनिझम विधानाचं समर्थन केलं आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिलं, “नीना जी जे बोलल्या त्यावर इतक्या तीव्र प्रतिक्रिया का येत आहेत, हे मला समजत नाहीये. स्त्री आणि पुरुष कधीही समान होऊच शकत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीत एकमेकांपासून वेगळे आहेत. ते खरंच समान आहेत का? स्त्री-पुरुष सोडा, पण आपल्यापैकी कोणीही समान नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण विकासाच्या वेगळ्या पातळीवर आहे. आपल्याकडे देव, गुरु, वरिष्ठ, पालक किंवा अगदी बॉसदेखील आहेत. काहींना अधिक अनुभव आहे किंवा काही प्रत्यक्षात अधिक विकसित झाले आहेत, पण आपण कोणत्याही पातळीवर समान नाही.”
“मी नेहमी चुकीच्या लोकांना डेट केलंय”, नीना गुप्ता यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “खूप फालतू अन् वाईट…”
पुढे कंगना म्हणाली, “आम्हाला पुरुषाची गरज आहे का? अर्थातच आहे. जशी पुरुषाला एका स्त्रीची गरज असते. माझ्या आईला जर तिचे आयुष्य एकटेच जगावे लागले असते तर ते खूप अडचणींनी भरलेले असते. त्याचप्रमाणे माझे वडील देखील माझ्या आईशिवाय त्यांचे जीवन जगू शकत नाहीत. यात कसली लाज वाटते, हेच मला समजत नाही. पुरुषांना महिन्यातून सात दिवस रक्तस्त्राव (मासिक पाळी) होत नाही, तसेच त्यांच्यात ती दैवी स्त्री शक्ती नाही, ज्याच्यासाठी प्रत्येकजण तहानलेला असतो. मुलं स्वतःच्या घरात, बाहेर फिरताना असुरक्षित नाहीत, त्याच तुलनेत तरुण मुलींसाठी मात्र या गोष्टी अजिबात सोप्या नाहीत, असं कंगनाने लिहिलं.
“जेव्हा पुरुष गरोदर…” स्त्री-पुरुष समानतेबद्दल अन् ‘फेमीनिजम’बद्दल नीना गुप्तांनी केलं परखड भाष्य
नीना गुप्ता यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
“मला हे सांगावं वाटतंय की सध्याच्या फालतू फेमिनिझमकडे दुर्लक्ष करणं फार गरजेचं आहे. तसेच महिला या पुरुषांच्या समान आहेत याकडेही दुर्लक्ष करायला हवं. आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यापेक्षा, कायम कामाकडे लक्ष देण्यापेक्षा जर तुम्ही गृहिणी असाल तर त्या कामाला कमी लेखू नका, तेही खूप महत्त्वाचं काम आहे. तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवा, हाच संदेश मला द्यायचा आहे,” असं नीना गुप्ता रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्ट शोमध्ये म्हणाल्या होत्या.