Suniel Shetty Injured : अभिनेता सुनील शेट्टी १९९० च्या दशकातील सिनेमांत अ‍ॅक्शन सीन्स देत त्याच्या जबरदस्त शरीरयष्टीने प्रेक्षकांचे मन जिंकत असे. अनेक वर्ष अ‍ॅक्शन सिनेमे केल्यावर सुनील शेट्टी कॉमेडी सिनेमांकडे वळला. काही वर्ष सुनील शेट्टी अ‍ॅक्शन सिनेमांपासून दूरच होता. मात्र, सुनील शेट्टी पुन्हा एकदा अ‍ॅक्शन कलाकृतीत दिसणार असून हा सिनेमा नसून एक वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचं सध्या शूटिंग सुरू असून या सेटवर सुनील शेट्टीचा अपघात झाला आहे.

अभिनेता सुनील शेट्टी नुकताच त्याच्या आगामी वेब शो ‘हंटर’च्या सेटवर जखमी झाला. या शोचं मुंबईत शूटिंग सुरू होतं, सुनील शेट्टीने त्याच्या सर्वच स्टंट्स स्वतः करण्याचं ठरवलं होतं. यातील एका सीनमध्ये स्टंट करत असताना सुनील शेट्टी जखमी झाला आहे.

actress Athiya Shetty announces pregnancy
अथिया शेट्टी व केएल राहुल होणार आई-बाबा; लग्नानंतर दोन वर्षांनी होणार नव्या सदस्याचं आगमन
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
India highest grossing movie in china Secret Superstar
फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा…हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”

एका फायटिंग सीनमध्ये, चार ते पाच फायटरबरोबर सुनील शेट्टी सीन शूट करत असताना हा अपघात घडला. या दृश्यात एका लाकडी ओंडक्याचा वापर करण्यात आला होता, परंतु सीन शूट करत असताना चुकीच्या टायमिंगमुळे ओंडका चुकून सुनील शेट्टीच्या बरगड्यांवर जोरात लागला. घटनेच्या वेळी सुनील शेट्टीला अत्यंत वेदना होत असल्याचं प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार समजलं. सेटवरील सगळ्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता पसरली. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील शेट्टीसाठी तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यात आली. सेटवरच डॉक्टर आणि एक्स-रे मशीनची व्यवस्था करण्यात आली होती, सुनीलला गंभीर दुखापत किंवा अंतर्गत इजा झाली की नाही याची तपासणी करण्यात आली.

एक अ‍ॅक्शन हिरो अशी सुनील शेट्टीची बॉलीवूडमध्ये ओळख आहे. भूमिका वास्तववादी वाटावी यासाठी तो स्वतः त्याचे स्टंट करतो. सुनील शेट्टीच्या सेटवरील अपघातानंतर संपूर्ण टीम त्यांच्या आरोग्याबद्दल काळजीत आहे.

हेही वाचा…Video : ‘मन्नत’ बाहेर ९५ दिवस किंग खानच्या भेटीसाठी थांबला चाहता, आर्यन खानसाठी लिहिली स्क्रिप्ट; पण…

सुनील शेट्टी लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि परेश रावलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे.

Story img Loader