Tejas Box office collection Day 3 : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा बहुचर्चित चित्रपट तेजस २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. ‘तेजस’ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली.

प्रदर्शनाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हे आकडे पाहता दोन दिवसात या चित्रपटाने केवळ २.५० कोटींची कमाई केली. आता नुकतंच तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेसुद्धा समोर आले आहेत अन् ते पाहता कंगनाच्या ‘तेजस’ला पहिल्या तीन दिवसांत ४ कोटींचा टप्पाही पार करता आलेला नाही.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा

आणखी वाचा : व्हिडीओच्या माध्यमातून कंगना राणौतने प्रेक्षकांना केली ‘तेजस’ पाहायची विनंती; नेटकरी ट्रोल करत म्हणाले…

पहिला वीकेंड हा ‘तेजस’साठी फारच निराशाजनक ठरला आहे. ‘सॅकनिक’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही केवळ १.३० कोटींची कमाई केल्याचं समोर आलं आहे. ६० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाला पहिल्या वीकेंडलाच ५ कोटींचा टप्पाही पार करता न येणं ही कंगनासाठी फारच चिंताजनक बाब आहे.

याबरोबरच रीपोर्टनुसार हा चित्रपट येणाऱ्या मंडे टेस्टमध्येही सपशेल नापास होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. एकूणच हे आकडे पाहता सोमवारी हा चित्रपट फारफार तर ५४ लाखांची कमाई करेल. कालच कंगनाने एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायची विनंती केली आहे. यावरुन तिला लोकांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. ‘धाकड’पेक्षा ठीक असला तरी कंगनाच्या ‘तेजस’ला बॉक्स ऑफिसवर स्वतःचं अस्तित्त्व टिकवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागणार हे नक्की.