९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. ‘तेजाब’, ‘हम आपके हैं कौन’, ‘राम लखन’, ‘खलनायक’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. दमदार अभिनयाबरोबरच माधुरी उत्तम नृत्यांगणा म्हणून देखील ओळखली जाते. १५ मे रोजी तिने आपला ५७ वा वाढदिवस साजरा केला. याचा खास व्हिडीओ तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधुरी दीक्षितने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यावर तिचे सुरुवातीचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. परंतु, त्यानंतर आलेला ‘तेजाब’ पडद्यावर सुपरहिट ठरला. यानंतर माधुरीने मागे वळून पाहिलं नाही. ५७ व्या वाढदिवसानिमित्त धकधक गर्लवर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. परंतु, माधुरी एका खास कारणामुळे आनंदी होती. हे कारण म्हणजे तिची दोन्ही मुलं तिला शुभेच्छा देण्यासाठी खास परदेशातून भारतात आली होती. याबाबत माधुरीने ‘आस्क मी सेशन’मध्ये उत्तर दिलं होतं.

हेही वाचा : कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित ‘या’ महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या

बॉलीवूडमध्ये यश मिळवल्यावर करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने डॉ. नेनेंशी लग्नगाठ बांधली. या जोडप्याला अरिन आणि रायन अशी दोन मुलं आहेत. एका नेटकऱ्याने अभिनेत्रीला “वाढदिवसाला मिळालेलं सर्वात सुंदर गिफ्ट काय आहे?” असा प्रश्न विचारला होता. यावर माधुरीने “माझी दोन्ही मुलं परदेशातून मला सरप्राइज देण्यासाठी इथे आली होती” असं उत्तर दिलं.

हेही वाचा : “क्रिकेट काय शिकवतं?”, RCB च्या मॅचनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; कोहलीबद्दल म्हणाला…

माधुरीचे पती डॉ. नेनेंनी त्यांच्या घरगुती सेलिब्रेशनचा Inside व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “हा आठवडा खूपच छान गेला…खरंतर आम्ही केवळ आठवडा नाही, माधुरीसाठी पूर्ण महिना साजरा केला पाहिजे” असं कॅप्शन नेनेंनी या व्हिडीओला दिलं आहे. अभिनेत्रीने पती व दोन मुलांबरोबर केक कापून छोटसं घरगुती सेलिब्रेशन केलं. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : “नवऱ्याबरोबर का फिरत नाहीस?”, चाहतीच्या प्रश्नावर अमृता खानविलकरचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, “हिमांशू आणि मला…”

दरम्यान, धकधक गर्ल सध्या ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. या शोमध्ये देखील मोठ्या दणक्यात माधुरीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसानिमित्त विशेष भागाच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी ‘डान्स दीवाने’मध्ये खास उपस्थिती लावली होती. अंकिताने माधुरीच्या लोकप्रिय गाण्यांवर जबरदस्त डान्स केल्याचं यावेळी पाहायला मिळालं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit birthday celebration with husband dr shriram nene and children sva 00
First published on: 19-05-2024 at 19:49 IST