बॉलीवूडमधली अभिनेत्री मलायका अरोरा अभिनयाबरोबरच उत्तम डान्सरही आहे. ‘चल छय्या छय्या’, ‘मुन्नी बदनाम’ अश्या गाण्यांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. ‘नच बलिये’, ‘झलक दिखलाजा’ यांसारख्या डान्स शोजचे मलायकाने परीक्षणही केले आहे. सध्या मलायका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

मलायकाचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘आंटीजी आंटीजी’ या गाण्यावर मलायका एका मुलाबरोबर थिरकताना दिसत आहेत. उत्तम डान्स मूव्हज करत दोघंही डान्सचा आनंद घेताना पाहायला मिळतायत. पण, मलायकाबरोबर हा मुलगा नक्की कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर जाणून घेऊया महाराष्ट्राशी नातं असलेल्या या मुलाबाबत.

chala hawa yeu dya fame bharat ganeshpure entry in zee marathi shiva serial
‘चला हवा येऊ द्या’ संपल्यावर लोकप्रिय अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो
bhuvan bam comments on prathamesh parab recent video
प्रथमेश परबच्या व्हिडीओवर लोकप्रिय अभिनेत्याची कमेंट; म्हणाला, “क्षितिजा तुझा नवरा खूप…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

हेही वाचा… ‘त्या’ बॅगमुळे आलिया भट्ट होतेय ट्रोल; नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले, “ढोंगीपणा…”

प्रतीक उतेकर हा मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहे. ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या मराठी रिॲलिटी शोमध्ये प्रतीक उतेकरने सहभाग घेतला होता. उपविजेतेपद मिळवत प्रतीकने प्रेक्षकांचं मन जिंकलं. यानंतर त्याने ‘डान्स दिवाने’, ‘झलक दिखलाजा’, ‘नच बलिये’ अशा अनेक शोंसाठी नृत्यदिग्दर्शन केले. माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रापासून ते सलमान खानपर्यंत अनेक कलाकारांसाठी प्रतीकने नृत्यदिग्दर्शन केलं आहे. आज तो नामांकित सेलिब्रिटी कोरियोग्राफर आहे.

‘फिल्मीग्यान’ या अकाउंटवरील मलायका आणि प्रतीकच्या व्हायरल डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ही नोरासारखी नाचते आहे”, असं एक जण कमेंट करत म्हणाला. तर “आंटी बस करा आता”, अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली आहे.

दरम्यान, मलायका ‘झलक दिखलाजा’ या शोमध्ये परीक्षक म्हणून कार्यरत होती. नुकताच या शोचा ग्रॅंड फिनाले पार पडला. मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झाल्यास, १९९८ साली मलायका अरोरा आणि अरबाज खान लग्नबंधनात अडकले होते. १९ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर बरेच वर्ष मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.