बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर, त्याची पत्नी मीरा राजपूत आणि शाहिदचा धाकटा भाऊ इशान खट्टर यांच्यातील नातं खूपच खास आहे. ते तिघेही अनेकदा मजेशीर व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसतात. तिघेही मस्ती करताना दिसतात. त्यात त्यांचा बाँड पाहायला मिळतो. अलीकडेच शाहिदने असाच एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो, पत्नी मीरा आणि भाऊ इशानसह मस्ती करताना दिसतोय. चाहत्यांना हा व्हिडीओ चांगलाच पसंतीस पडला आहे.
व्हिडीओमध्ये शाहिद कपूर पत्नी मीरा आणि भाऊ इशानसह चित्रपटातील एक सीन करताना दिसत आहे. आमिर खानच्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटातील तो आयकॉनिक सीन तुम्हाला आठवत असेल. जिथे आमिर सैफ अली खानला मर्द बनण्याचा सल्ला देतो आणि त्याला त्याच्या मैत्रिणीसमोर खंबीरपणे उभे राहण्यास सांगतो. या सीनवर शाहिद, मीरा आणि इशान लिप सिंक करताना दिसले, पण या तिघांची स्टाइल थोडी वेगळी होती. हा व्हिडीओ मजेशीर पद्धतीने बनवण्यात आला होता, पण त्याचवेळी इशानला त्याच्या वहिनीने कानाखाली जोरदार लगावली. ‘दिल क्या चाहता है?’ असं कॅप्शन शाहिदने व्हिडीओला दिलंय.
व्हिडीओमध्ये इशान सैफच्या स्टाईलमध्ये बोलताना दिसत आहे, तर मीरा आपल्या मैत्रिणीच्या स्टाईलमध्ये इशानला फटकारताना दिसत आहे. पण इशानला मीरासमोर काहीच बोलता येत नाही. यावर शाहिदने इशानला मर्द बनण्याचा सल्ला देतो. यानंतर इशान कबीर सिंगच्या स्टाईलमध्ये मीराजवळ येतो, पण इशान काही बोलण्याआधी मीराने त्याला गप्प केलं आणि थप्पड मारली. मीरा म्हणते, “मला तुझा चेहराही पाहायचा नाही. निघ इथून” आणि मग ती इशानला कानशिलात लगावते. व्हिडीओ संपल्यावर तिघेही हसू लागतात.
हा व्हिडीओ चाहत्यांच्याही पसंतीस पडला असून ते यावर हसण्याच्या इमोजी कमेंट करत आहेत.