नसीरुद्दीन शाह बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी व स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते त्यांच्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांत त्यांनी केलेल्या अशाच काही विधानांमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला आणि त्यांना एक नाही तर दोन वेळा माफी मागावी लागली आहे.

हेही वाचा – “आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…”

Congress Leader Kamalnath Promised Giving Article 370 Masjid Place But Real Video Is Different
“३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका
Did Marathas renamed Ramgarh as Aligarh
मराठ्यांनी रामगढचे अलिगढ असे नामांतर केले? इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णींनी मांडलं सत्य
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

काही दिवसांपूर्वी नसीरुद्दीन म्हणाले होते की, पाकिस्तानात पूर्वीच्या तुलनेत आता सिंधी भाषा बोलली जात नाही. पाकिस्तानातील सिंधी समाजातील काही कलाकारांनी यावर आक्षेप घेतला होता. आता नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. दुसरीकडे, भारतातील मराठी भाषेचा संबंध फारसीशी जोडल्यावरही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. आता सिंधी भाषेबद्दलच्या वक्तव्यावरून त्यांनी फेसबूक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय.

“माझी चूक झाली”, नसीरुद्दीन शाहांचं ‘त्या’ दोन विधानांबद्दल स्पष्टीकरण; म्हणाले, “मराठी भाषेला कमी…”

“ठीक आहे. मी पाकिस्तानमधील संपूर्ण सिंधी भाषिक लोकांची माफी मागतो. माझ्या चुकीच्या मतामुळे त्यांचा अपमान झाला असेल. मी मान्य करतो की माझी माहिती अपुरी होती. पण एवढ्यासाठी मला सुळावर चढवणं गरजेचं आहे का? खरंतर इतकी वर्षं ज्ञानी व्यक्ती म्हणून परिचित झाल्यानंतर आता ‘बेजबाबदार’ आणि ‘वैचारिक असल्याचं भासवणारा’ म्हणवून घ्यायची मला मजा येतेय. हा खरंच दखल घेण्यासारखाच बदल आहे!”, असं नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मागितली होती माफी

“मी नुकत्याच बोललेल्या दोन गोष्टींबाबत पूर्णपणे अनावश्यक वाद होताना दिसत आहेत. पहिला, पाकिस्तानमधील सिंधी भाषेबद्दलच्या माझ्या चुकीच्या विधानावरून झाला. तिथे माझी चूक झाली. तर, दुसरा मराठी आणि फारसी यांच्यातील संबंधांबद्दल मी जे बोललो, त्यावरून वाद झाला. ‘बरेच मराठी शब्द फारसी मूळचे आहेत’ असं मी म्हटलं होतं. माझा उद्देश मराठी भाषेला कमी लेखण्याचा नव्हता तर विविधता सर्व संस्कृतींना कशी समृद्ध करते याबद्दल बोलण्याचा होता. उर्दू ही हिंदी, फारसी तुर्की आणि अरबी भाषांचे मिश्रण असलेली भाषा आहे. इंग्रजीने हिंदुस्तानीचा उल्लेख न करण्यासाठी सर्व युरोपियन भाषांमधून शब्द घेतले आहेत आणि पृथ्वीवर बोलल्या जाणार्‍या प्रत्येक भाषेबद्दल ते खरं आहे, असं मला वाटतं,” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले होते.