पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे आज दुबई मधील रुग्णालयात दिर्घ काळाच्या आजारानंतर निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. परवेज मुशर्रफ यांना राजकारणाबरोबरीने क्रिकेट आणि बॉलिवूडची त्यांना आवड होती. बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचे ते चाहते होते. भारतभेटी दरम्यान त्यांची भेट झाली होती.

अभिनेत्री राणी मुखर्जी आता बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नसते. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिने एका मुलाखतीत परवेज मुशर्रफ यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे ती असं म्हणाली होती, “एप्रिल २००६ हे वर्ष मला चांगलेच लक्षात आहे. मुशर्रफ यांच्या भारत भेटीदरम्यान मी एकमेव बॉलिवूड स्टार होते जिला दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी करण्यात आले होते. मी पाकिस्तानात प्रसिद्ध आहे असे त्यांनी मला सांगितले.”

Kiara Siddharth Wedding Update: प्रीतीच्या लग्नासाठी कबीर सिंग पोहोचला जैसलमेरला; व्हिडीओ व्हायरल

राणीला या आमंत्रणामागे एक खास कारण होते ते म्हणजे परवेझ मुशर्रफ यांची पत्नी बेगम साहबा मुशर्रफ यांना राणी मुखर्जी आवडत होती. राणीने ‘वीर जारा’ चित्रपटात साकारलेली एका वकिलाची भूमिका त्यांना विशेष आवडली होती. या भेटीत त्यावेळचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांनीही तिला पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी दिल्लीच्या दरियागंज याठिकाणी झाला होता. १९४७ रोजी भारताच्या फाळणीदरम्यान मुशर्रफ यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. ते कराची येथे स्थायिक झाले. २०१६ पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्यामुळे त्यांना पाकिस्तान सोडावे लागले होते.