बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख, दीपिका आणि जॉन यांच्या या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. करोना काळानंतरचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. पण आता पठाणच्या कमाईत घट पहायला मिळत आहेत.

‘पठाण’ने प्रदर्शनाच्या सात दिवसांतच भारतातून ३०० कोटींहून अधिक तर जगभरातून ६०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. ‘पठाण’ हा ३०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात कमी दिवसांमध्ये पोहोचणारा चित्रपट ठरला आहे. परंतु आता दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईचा वेग थोडासा मंदावलेला दिसत आहे.

actress Smriti Khanna expecting second baby
लग्नानंतर सात वर्षांनी दुसऱ्यांदा आई होणार लोकप्रिय अभिनेत्री; मोठ्या लेकीसह खास फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

हेही वाचा : “मला नाही वाटत हा चित्रपट…”; ‘पठाण’चं कलेक्शन पाहून ‘KGF’च्या निर्मात्यांनी केलं मोठं वक्तव्य

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात ५५ कोटींची कमाई केली, तर जगभरातून या चित्रपटाने १०० कोटी कमावले. तर पहिल्या वीकएण्डपर्यंत या चित्रपटाने भारतातून २०० हुन अधिक कोटींचा गल्ला जमवला होता. तर काल म्हणजेच प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी या चित्रपटाने १७.५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतातून एकूण ३३३.५५ कोटींची कमाई केली आहे. या आठ दिवसांमध्ये पठाणच्या कमाईची गती मंदावताना दिसत आहेत. पण तरीही या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निश्चित केलं आहे.

आणखी वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल थक्क

या चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. शाहरुखचा हा जबरदस्त कमबॅक प्रेक्षकांनी धूमधडाक्यात साजरा केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रचंड वाद निर्माण झाला, तरी सुद्धा अगदी कमी प्रमोशन करूनही ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला आहे.