भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित असणारा ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी यांची भूमिका साकारत आहे. आता दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जाहीर केली आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर पंकज त्रिपाठी दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना त्यांनी ट्रेलरची तारीख सांगितली आहे.
आणखी वाचा : “त्याने माझ्यावर कॉफी…”; ‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्रीचा शाहरुख खानबद्दल खुलासा, म्हणाली…

‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ट्रेलरमध्ये काय असणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “पवई ते अंधेरी चालत जायचो”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने सांगितला कठीण प्रसंग; म्हणाला, “१५० रुपये…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट १९ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे रवी जाधव करत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.