scorecardresearch

Premium

“पाच वर्षांत तेलुगू चित्रपटसृष्टी…” ‘अ‍ॅनिमल’च्या प्री-रिलीज ईव्हेंटदरम्यान राजकीय नेत्याचे मोठे विधान; म्हणाले, “मुंबई आता…”

नुकताच हैदराबादमध्ये ‘अ‍ॅनिमल’चा प्री-रिलीज इवेंट पार पडला. या इवेंटला चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली

animal-pre-release-event
फोटो : व्हिडीओतून स्क्रीनशॉट

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

बॉक्स ऑफिसवर तर फक्त ‘अ‍ॅनिमल’चाच डंका वाजताना दिसत आहे. ज्या पद्धतीने रणबीरच्या चित्रपटासाठी एडवांस बुकिंग ते पाहता हा चित्रपट पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नव्हे तर ‘अ‍ॅनिमल’ हा रणबीरच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो असंही काही ट्रेड एक्स्पर्टनी सांगितलं आहे. नुकताच हैदराबादमध्ये ‘अ‍ॅनिमल’चा प्री-रिलीज इवेंट पार पडला. या इवेंटला चित्रपटातील सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली.

vikrant-massey-family
१७ व्या वर्षी भावाने स्वीकारला इस्लाम अन् वडील चर्चमध्ये…; विक्रांत मेस्सीने कुटुंबियांबद्दल केला मोठा खुलासा
Suhani Bhatnagar
‘डरमॅटोमायोसायटिस’ आजार आहे तरी काय? ज्यामुळे ‘दंगल’गर्ल सुहानी भटनागरचे निधन
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
pune Protest FTII Hindutva organization National Cinema Museum I am Not the River Jhelum Screening
पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारात हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन : ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ लवकरच येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

याबरोबरच या इवेंटला महेश बाबू व एसएस राजामौली यांचीही खास पाहुणे म्हणून उपस्थिती होती. महेश बाबूनेही रणबीरची प्रशंसा केली. ‘अ‍ॅनिमल’साठी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या डोक्यात महेश बाबूचं नाव होतं, पण महेश बाबूने चित्रपटाला नकार दिल्यानंतर हा प्रोजेक्ट रणबीरकडे आला. हैदराबादच्या इवेंटमध्ये काही राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. त्यापैकी तेलंगाणाचे कामगार आणि रोजगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. मंचावर येताच मल्ला रेड्डी यांनी थेट बॉलिवूडलाच आव्हान दिलं.

या व्हिडीओमध्ये मल्ला रेड्डी म्हणाले, “मी एक गोष्ट सांगू इच्छितो की पुढच्या पाच वर्षात बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड त्यावर तेलुगू चित्रपटसृष्टीच राज्य करणार. तुम्हाला एका वर्षातच हैदराबादलाच यायला लागेल, कारण मुंबई आता जुनी झाली आहे, बेंगलोरमध्ये ट्राफिक जाम आहे. संपूर्ण हिंदुस्तानात केवळ एकच शहर आहे ते म्हणजे हैदराबाद. आमचे दिग्दर्शक, कलाकार, अभिनेत्री सगळेच किती हुशार आहेत, पुष्पाने घातलेला धुमाकूळ लक्षात असेलच.”

मल्ला रेड्डी यांच्या वक्तव्यामुळे महेश बाबू तसेच रणबीर कपूर दोघांनाही फार अवघडल्यासारखं झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून लोक त्यावर टीका करत आहे. रेड्डी यांचं हे वक्तव्य अपमानकारक असल्याचं लोक म्हणत आहेत. संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अ‍ॅनिमल’ १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Politician controversial statement about mumbai bollywood during animal pre release event avn

First published on: 28-11-2023 at 12:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×