बॉलिवूडची देसी गर्ल आता ग्लोबल स्टार झाली आहे. फक्त भारतात नाही तर जगभरात तिने चांगलं नाव कमावलं आहे. प्रियांका चोप्रा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. प्रियांका ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतंच प्रियांकाने सिनेसृष्टीतील कटू अनुभवाबद्दल भाष्य केले आहे.

प्रियांका चोप्राने नुकतंच एका प्रसिद्ध मासिकाला मुलाखत दिली. त्यावेळी तिने तिच्या बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळाबद्दल भाष्य केले आहे. “माझ्या एका चित्रपटाच्या शूटींगदरम्यान दिग्दर्शकाला माझी अंतर्वस्त्र पाहायची होती”, असा धक्कादायक खुलासा केला आहे.
आणखी वाचा : वैभवी उपाध्यायने निधनाच्या १६ दिवसांपूर्वी केलेली पोस्ट चर्चेत, म्हणालेली…

“मी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा एका चित्रपटासाठी मी होकार दिला होता. त्यावेळी या चित्रपटात मी अंडरकवर गर्लचे पात्र साकारत होती. मी तेव्हा सिनेसृष्टीत नवीन होती आणि त्या दिग्दगर्शकाबरोबर पहिल्यांदाच काम करत होती. मी त्या कधीही भेटली नव्हते”, असे ती म्हणाली.

“या चित्रपटातील एका दृश्यात मी अंडरकवर एजेंटचे पात्र साकारत होती. त्यावेळी मला एका मुलाला शारीरिकरित्या आकर्षित करायचे होते, असे दृश्य चित्रीत करायचे होते. यासाठी मी संपूर्ण कपडे काढून तो सीन शूट करावा, असे त्या दिग्दर्शकाचे मत होते. तर माझ्या मते, या दृश्यासाठी माझ्या अंगावर काही तरी कपडे असावेत, असं मला वाटत होते”, असा खुलासाही तिने केला.

आणखी वाचा : “नवा सोबती…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने लग्नाचा पहिला फोटो केला शेअर

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण याचवेळी दिग्दर्शक म्हणाला, मला तिचे अंतर्वस्त्र पाहायचे आहेत. नाहीतर हा चित्रपट पाहायला कोण कशासाठी येईल, असे त्या दिग्दर्शकाने मला स्टायलिस्टसमोर सुनावले होते. मला त्याचे हे म्हणणं अजिबात आवडले नव्हते. मी या चित्रपटात जो अभिनय दाखवते किंवा जे योगदान देते, याची काहीही किंमत नव्हती. यानंतर या चित्रपटात मी दोन दिवस काम केले आणि नंतर या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी मी स्वत:च्या खिशातून प्रॉडक्शन हाऊसला पैसे दिले होते”, असेही तिने म्हटले.