बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुलगी राहा आता एक महिन्याची झाली आहे. आलिया- रणबीरच्या मुलीचं नाव आजी नीतू कपूर यांनी खूप विचारपूर्वक ठेवलं होतं. आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम मुलीच्या नावाबद्दल पोस्ट केली होती. त्यानंतर अनेकांचा तिच्या नावाचा उच्चार नेमका कसा आहे याबाबत गोंधळ उडाला होता. अशात आता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्याने आपल्या मुलीच्या नावाचा उच्चार सांगितला आहे.

दुबईच्या जेद्दाह येथे सुरू असलेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले आहेत. आता अभिनेता रणबीर कपूरनेही या फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असलेले दिसले.

आणखी वाचा- “आलिया हॉलिवूडला गेली तर मी….” रणबीर कपूरच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

रणबीर कपूरचा या फेस्टिव्हलमधील एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फेस्टिव्हलमध्ये दिलेल्या मुलाखतीत रणबीरने पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या नावाचा उल्लेख केला. मुलाखत घेणाऱ्या होस्टने बाबा झाल्याबद्दल रणबीरचं अभिनंदन केल्यानंतर तिच्याशी बोलताना त्याने म्हटलं, “धन्यवाद, तिचं नाव ‘राहा’ आहे.” आपल्या मुलीच्या नावाचा उच्चार रणबीरने ‘रा-हा’ असा केला. रणबीर कपूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आलिया भट्टने मुलीचा एक ब्लर फोटो शेअर करत तिच्या नावाची घोषणा केली होती. तिने लिहिलं होतं, “राहा हे नाव तिच्या आजीने निवडलं आहे. ज्याचे सुंदर अर्थ आहेत. राहाचा अर्थ डिवाइन पाथ असा होतो. स्वाहिलीमध्ये याचा अर्थ खुशी म्हणजेच आनंद असा आहे. तर संस्कृतमध्ये राहा म्हणजे वंश वाढवणारा, याशिवाय बांग्लामध्ये आराम, अरबीमध्ये शांतता, तसेच या नावाचा अर्थ आनंदी आणि स्वातंत्र्य असाही आहे.”