काजोल व राणी या दोघीही बॉलीवूडमधील ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अजुनही सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या या दोघीही एकमेकींच्या नातवाईक आहेत. काजोलचे वडील शोमू मुखर्जी आणि राणीचे वडील राम मुखर्जी हे सख्खे चुलत भाऊ होते. त्या नात्याने काजोल व राणी या चुलत बहिणी आहेत. दोघींचं जवळचं नातं असलं तरी त्यांचं एकमेकींशी फार सख्य नाही. राणीने काजोलबद्दल एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

‘गॅलाटा प्लस’ ला दिलेल्या मुलाखतीत राणीने काजोल व तिच्या नात्याबद्दल विधान केलं. ती म्हणाली, “मला वाटतं की कुटुंब एक अशी गोष्ट आहे जी तुमच्यासोबत कायम राहते. त्यामुळे जगाने तुमच्याकडे कुटुंबासारखं पाहणं गरजेचं असतं. मतभेद सर्वत्र होतात, पण मतभेदाचे कारणच नसेल तर मतभेद का व्हावेत? माझ्यात आणि काजोलमध्येही तेच झालं. जे झालं ते फक्त गैरसमज व एकमेकींशी नीट संवाद न साधल्याने झालं.”

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

राणीने काजोलशी असलेल्या मतभेदाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे त्यांच्यातील दुरावा मिटल्याची चर्चा होत आहे. राणीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात झळकली होती. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

चार वर्षे अफेअर, लिव्ह इन अन् ब्रेकअप! जेव्हा आरती सिंहच्या संगीत सोहळ्यात एकाच वेळी आलं हे एक्स कपल, पाहा Video

काजोलबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘लस्ट स्टोरीज २’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात दिसली होती. याशिवाय तिची द ट्रायल नावाची वेब सीरिज चांगलीच गाजली होती. या दोन्ही ओटीटीवरील कलाकृती होत्या.