scorecardresearch

Premium

विजय देवरकोंडाला ऑनस्क्रिन किस केलं अन्…; ‘त्या’ बोल्ड सीनबाबत रश्मिका मंदानाचा खुलासा, म्हणाली, “खूप रडले आणि…”

रश्मिका मंदानाचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘गुड बाय’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने बोल्ड सीनबाबत भाष्य केलं आहे.

Rashmika mandanna vijay deverakonda
रश्मिका मंदानाचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'गुड बाय' प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने बोल्ड सीनबाबत भाष्य केलं आहे.

‘गुड बाय’ चित्रपटामधून अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिचा हा पहिलाच हिंदी चित्रपट. बॉलिवूड पदार्पणामध्येच रश्मिकाला बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच ती व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच रश्मिकाने आपल्या याआधीच्या चित्रपटामधील बोल्ड सीनबाबत भाष्य केलं.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

sai tamhankar 3
“तू पहिल्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती का?” सई ताम्हणकर सांगितला किस्सा, म्हणाली…
rajveer deol
‘प्रादेशिक चित्रपट बोलके असतात’
the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर
Siddharth on being forced to leave Chithha event in Bengaluru
“मी पैसे खर्च करून…”, राजकीय वादातून आंदोलकांनी चित्रपटाचं प्रमोशन थांबवल्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

बोल्ड सीनबाबत काय म्हणाली रश्मिका मंदाना?
२०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डियर कॉमरेड’ या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये रश्मिकाने विजय देवरकोंडाबरोबर काम केलं. या चित्रपटामध्ये विजयबरोबर तिचा किसिंग सीन होता. पण या सीननंतर तिला ट्रोलिंगचा अधिक सामना करावा लागला. एका बोल्ड सीनमुळे आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामोर जावं लागलं हे रश्मिकाने सांगितलं आहे.

एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली, “‘डियर कॉमरेड’ चित्रपटासाठी बोल्ड सीन चित्रीत केल्यानंतरचा काळ माझ्यासाठी खूप वेदनादायी होता. सगळ्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे असंच मला यावेळी वाटायचं. अंथरुणामध्ये मी पडून राहायचे. सतत रडायचे. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता.”

आणखी वाचा – डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला अन् रणबीर कपूरने होणाऱ्या बाळासाठी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

रश्मिकाला या बोल्ड सीननंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला पण तिने यामधून स्वतःला सावरलं. आता रश्मिका-विजय एकमेकांना डेट करत असल्याचंही बोललं जातं. पण अद्यापही दोघांनी याबाबत कोणतंच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये विजयला रश्मिकाबरोबरच्या नात्याबाबत विचारता ती माझी चांगली मैत्रिण असल्याचं त्याने म्हटलं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rashmika mandanna talk about trolling for kissing scene with actor vijay deverakonda see details kmd

First published on: 07-10-2022 at 12:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×