सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे गोळीबार झाला होता. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर दोन हल्लेखोरांनी पाच राउंड फायरिंग केली होती. या दोन्ही आरोपींना घटनेच्या दुसऱ्याच दिवशी गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली होती. आता या घटनेत वापरणाऱ्या बंदुकी पोलिसांनी शोधून काढल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना आणखी एक यश मिळालं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरतमधील तापी नदीतून गोळीबारात वापरलेली बंदूक जप्त केली आहे. यासोबतच त्यांना एक जिवंत काडतूसही सापडलं आहे. दोन्ही आरोपींनी त्यांच्याकडे एक नाही तर दोन बंदुका असल्याचं सांगितलं होतं. पोलीस आता दुसऱ्या बंदुकीचा शोध घेत आहेत.

“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान

सागर पाल आणि विकी गुप्ता या आरोपींनी गोळीबार केल्यानंतर सुरतला जाताना ही बंदूक तापी नदीत फेकली होती, असा खुलासा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. त्यांच्याकडे दोन बंदुका होत्या आणि त्यांना दोन्ही बंदुकांमधून १० राऊंड फायरिंग करण्याचे आदेश देण्यात आले होते, असाही खुलासा आरोपींनी चौकशीत केला आहे.

सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर कसं दिसतं? पाहा Inside Photos

दोन्ही हल्लेखोरांना गोळीबार करण्यास सांगण्यात आलं होतं, पण पकडले जाण्याच्या भीतीने एकच गोळीबार करू शकला आणि नंतर दोघेही तिथून पळून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनेक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी आतापर्यंत १० जणांचे जबाब नोंदवले आहेत.

ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”

पीटीआयच्या वृत्तानुसार, सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांची एक टीम बंदूक जप्त करण्यासाठी सुरतला पोहोचली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट सीनियर पोलीस इन्स्पेक्टर दया नायक हे देखील मुंबई क्राईम ब्रँचच्या टीमसोबत सुरतला गेले होते. जिथे स्थानिक गोताखोर आणि मच्छिमारांच्या मदतीने एक बंदूक जप्त करण्यात आली, आता दुसऱ्या बंदुकीचा शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan home firing mumbai police recover gun from tapi river in surat hrc
Show comments