बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडे ही अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र व्हेकेशनला जाताना व इव्हेंट्सला जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. अनन्या व आदित्यचं नातं बॉलीवूडमधील चर्चेचा विषय आहे. आता अनन्याच्या रिलेशनशिपबाबत चंकीने प्रतिक्रिया दिली आहे. आपण आपल्या २५ वर्षांच्या मुलीवर नियंत्रण ठेवू इच्छित नाही, असं त्याने म्हटलं आहे.

‘लेहरेन’ला दिलेल्या मुलाखतीत चंकीला अनन्याच्या रिलेशनशिपबद्दल आणि तिच्या मुलाखतींमध्ये ती आदित्यचा उल्लेख करते याबाबत विचारण्यात आलं. त्यावर चंकी म्हणाला, “ठीक आहे. मला वाटतं की ती २५ वर्षांची आहे, ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहे. त्यामुळे तिला हवं ते करायला ती मोकळी आहे. माझ्या २५ वर्षांच्या मुलीला तिने काय करावं हे सांगण्याची माझी हिंमत कशी होईल.” चंकीने चित्रपटांमध्ये अनन्याने केलेल्या इंटिमेट सीनबद्दलही प्रतिक्रिया दिली. “मला त्या सीनबद्दल काहीच अडचण नाही. मी हॉलीवूड चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन पाहिले आहेत. ते सीन करण्यात काही गैर नाही, तुम्हालाही ते स्वीकारावं लागेल,” असं चंकी म्हणाला.

ट्विंकल खन्नाने अंडरवर्ल्ड डॉनच्या पार्टीत केला होता डान्स? प्रतिक्रिया देत म्हणाली, “दाऊदने…”

चंकीला अनन्या व रायसा या दोन मुली आहेत. या मुली त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात का? असं विचारल्यावर तो म्हणाला, “माझ्या दोन्ही मुली खरोखरच भावनाच्या (चंकीची पत्नी) खूप जवळ आहेत. जेव्हा त्यांना काही हवं असतं तेव्हा त्या मला फोन करतात, नाहीतर त्या त्यांच्या आईच्या खूप जवळ आहेत. अर्थात भावना व त्यांच्या वयात माझ्याइतकं अंतर नाही. पण जेव्हा त्यांना कोणताही सल्ला हवा असतो तेव्हा मी त्यांच्यासाठी हजर असतो.”

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

चंकीने अनन्याचं कौतुक केलं आणि तिला पहिला चित्रपट मिळाला, तेव्हाची आठवण सांगितली. “तिला पहिला चित्रपट मिळाला तो माझ्यासाठी सर्वात अभिमानाचा क्षण होता. ऑफर आल्यावर तिने तो चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. आधी निर्मात्यांना ती लहान वाटली होती, मग ती ऑडिशनसाठी गेली आणि तिला चित्रपट मिळाला. तिने न्यूयॉर्क आणि एलए इथं कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, त्यामुळे कुटुंबावर दबाव होता. मी तिचे कॉलेज ॲडमिशन सहा महिने ठेवले, त्यासाठी मी जवळपास ५०० डॉलर्स दिले होते, पण त्याच काळात तिला स्वतःच्या बळावर चित्रपट मिळाला आणि तो माझ्यासाठी सर्वात अभिमानाचा क्षण होता,” असं चंकी म्हणाला.

कामाबद्दल बोलायचं झाल्यास अनन्या शेवटची ‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्याबरोबर दिसली होती.