Tiger 3 Box Office Collection Day 1 : सलमान खान व कतरिना कैफ यांचा बहुचर्चित ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. रविवारची सुट्टी असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर सलमान व कतरिनाच्या स्पाय चित्रपटाच्या या तिसऱ्या भागाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याचे आकडे समोर आले आहेत.

अब्जाधीश उदय कोटक यांच्या मुलाने माजी मिस इंडियाशी बांधली लग्नगाठ, शाही विवाह सोहळ्याचे फोटो आले समोर

allu arjun pushpa 2 The Rule movie first song pushpa pushpa promo out
Video: अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, अभिनेता म्हणाला…
Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD
‘शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे!’ Kalki 2898 AD चा टीझर प्रदर्शित; ‘अश्वत्थामा’च्या दमदार भूमिकेत आहेत अमिताभ बच्चन
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

‘टायगर ३’ ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाची आकडेवारी बघता अखेर सलमानचा चित्रपट बघायला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक थिएटर्समध्ये गेले आहेत, असंच म्हणावं लागेल. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार टायगर ३ ने पहिल्या दिवशी ४० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपटाने तब्बल ४४.५० कोटी कमावले आहेत. चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ४४.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

“अगले जनम मोहे ‘ओरी’ किजो”, अनन्या पांडे-सारा अली खानचा ‘तो’ व्हिडीओ पाहून अश्नीर ग्रोव्हरची पोस्ट

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपट दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी जवळपास २५ कोटींची कमाई करू शकतो. खरं तर हे पहिल्या दिवसाच्या तुलनेने कमी असेल, पण चित्रपट रविवारी प्रदर्शित झाल्याने सोमवारपासून आठवडा सुरु होतो, तसेच आज कोणतीही सुट्टी नाही, त्यामुळे एकूण कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळेल. पहिल्या दिवसाची कमाई आणि दुसऱ्या दिवसाचे अंदाज पाहता चित्रपट तीन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

दरम्यान, ‘टायगर ३’ या चित्रपटात सलमान खान टायगरच्या भूमिकेत तर कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत नवीन चेहरा आहे. चित्रपटांमध्ये आपल्या रोमँटिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला इमरान हाश्मीने या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्याला नव्या रुपात पाहता येणार आहे. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर ‘टायगर ३’ येत्या काळात किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.