scorecardresearch

समांथा रुथ प्रभूने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे.

samantha-ruth-prabhu

कलाकार नेहमीच त्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. याचबरोबर लक्ष वेधून घेते ते त्यांच्याकडे असलेली प्रॉपर्टी. कलाकारांची आलिशान घरं नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आता दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु हिने एक आलिशान घर खरेदी केलं आहे. ज्याची किंमत ऐकून नेटकरी आवाक् झाले आहेत.

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. तिने हिंदी चित्रपटांमध्ये जरी काम केलं नसलं तरी बॉलिवूड चित्रपट पाहणारे असंख्य प्रेक्षक तिचे चाहते आहेत. तिचे नाव आज भारतातल्या आघाडीनकीय अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता नुकताच तिने मुंबईत नवीन घर घेतलं आहे.

आणखी वाचा : समांथा रुथ प्रभूचा नवा विक्रम; ‘या’ बाबतीत दीपिका आणि आलियालाही टाकले मागे

काही दिवसांपूर्वीच समाथाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा एक फोटो पोस्ट केला होता. यात तिच्या मागे एक सुंदर सनसेट व्ह्यू दिसत होता. हा फोटो कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधला नसून तिच्या नवीन घरामध्ये काढलेला होता. तिने मुंबईत एक नवं घर खरेदी केला आहे. रिपोर्टनुसार तिने मुंबईमध्ये एक आलिशान 3 BHK चा फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटला सी फेसिंग व्ह्यू आहे असंही बोललं जातं. याची किंमत जवळजवळ १५ कोटी आहे. पण अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा देताना कंगना रणौतने पुन्हा एकदा साधला आलिया-रणबीरवर निशाणा? म्हणाली, “त्यांनी कधीही…”

दरम्यान समांथा लवकरच वरून धवन बरोबर ‘सिटाडेल’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. पण अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 18:10 IST
ताज्या बातम्या