शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होताच किंग खानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी करत आहेत. चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहून शाहरुख खान अगदी भारावून गेला आहे. त्याने नुकतंच ट्वीटरद्वारे त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ने तीन दिवसांमध्येच जगभरात कमावले इतके कोटी, खरी आकडेवारी समोर

‘पठाण’च्या यशानंतर शाहरुखने #AskSRK ट्विटर सेशन घेतलं. या सेशनद्वारे चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. शिवाय ‘पठाण’ची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून शाहरुख खूश असल्याचंही यावेळी दिसून आलं. त्याला चाहत्यांनी ‘पठाण’साठी शुभेच्छाही दिल्या.

यावेळी “‘पठाण’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहून तुला कसं वाटतं?” असा प्रश्न एका चाहत्याने शाहरुखला विचारला. यावर शाहरुख म्हणाला, “आता पुन्हा गावी जावं असं वाटतं.” असं मजेशीर उत्तर शाहरुखने दिलं. त्यानंतर आणखी एका चाहत्याने शाहरुखला ‘पठाण’ प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले. या तीन दिवसांमध्ये तुझ्या भावना काय आहेत? असं विचारलं.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “तो भारताचा…”

यावर शाहरुख म्हणाला, “आपल्या मुलाचं होणारं कौतुक पाहून वडील जितके आनंदी होतात तितकाच मी आनंदी आहे.” शाहरुख चाहते त्याच्यावर करत असलेलं प्रेम पाहून आनंदी झाला आहे. जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. शाहरुख व दीपिकासाठी हे मोठं यश आहे. ‘दंगल’, ‘बाहुबली २’, ‘केजीएफ २’ सारख्या चित्रपटांप्रमाणेच ‘पठाण’ही कमाई करत आहे.