scorecardresearch

Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ बॉक्स ऑफिसचा बादशाह! दुसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, ओलांडला १२० कोटींचा टप्पा

शाहरुख खानच्या बहुचर्चित चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींचा टप्पा गाठला आहे.

pathaan-box-office-1

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी तब्बल ५७ कोटी रुपये कमवत दमदार ओपनिंग केली. सुट्टीचा दिवस नसतानाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईनंतर दुसऱ्या दिवसाच्या आकडेवारीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काल २६ जानेवारीनिमित्त सुट्टी असल्याने चित्रपट दमदार कमाई करेल, अशी शक्यता होती आणि चित्रपट या शक्यतेवर खरा उतरला आहे.

Pathaan Box Office Collection: ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा खरा आकडा समोर; पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

‘पठाण’च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार पठाणने दुसऱ्या दिवसी तब्बल ७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट सुमीत कडेल यांनी ट्वीट करून ‘पठाण’च्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईची अपडेट दिली आहे. हे आकडे पाहता ‘पठा’ण बॉक्स ऑफिसचा बादशाह ठरला आहे.

‘पठाण’ने आतापर्यंत भारतात १२५ कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपट विकेंडपर्यंत तुफान कमाई करण्याची शक्यता आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत.

शाहरुख खानच्या बहुचर्चित चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर्सबाहेर तुफान गर्दी करत आहेत. चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी पाहता हा यंदाच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 09:25 IST