scorecardresearch

Premium

“लग्न कधी करणार?” चाहत्याच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरने दिलं भन्नाट उत्तर, अभिनेत्रीची कमेंट चर्चेत

लग्नावरून प्रश्न विचारणाऱ्या एका चाहत्याला तिने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Shraddha reply

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे. आतापर्यंत ती अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिच्या कामाबरोबर तिचा वैयक्तिक आयुष्यामुळे ती चांगलीच चर्चेत असते. तर आता लग्नावरून प्रश्न विचारणाऱ्या एका चाहत्याला तिने दिलेलं उत्तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

श्रद्धाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून श्रद्धा तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. तिचं लग्न कधी होणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. लग्नाबद्दल नुकताच तिला तिच्या एका चाहत्या आणि प्रश्न विचारला. त्याला श्रद्धाने अगदी हजरजबाबीपणे उत्तर दिलं आहे.

bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : पक्षविस्तार नव्हे पक्षबुडीचा संकेत
Advani to Swaminathan BJP 4 points behind giving Bharat Ratna
अडवाणी ते स्वामिनाथन! ५ दिग्गजांना सर्वोच्च सन्मान; ‘भारतरत्न’ देण्यामागे भाजपाचे ४ मुद्दे; नेमकं राजकारण काय? वाचा…
Saubhagyakankshini bravely confronts sexuality
‘ती’च्या भोवती..! लैंगिकतेला निडरपणे भिडणारी ‘सौभाग्यकांक्षिणी’

आणखी वाचा : Video: “मला भीती वाटत आहे…,” श्रद्धा कपूरने मराठी बोलत व्यक्त केली काळजी, अभिनेत्रीच्या साधेपणाने वेधलं लक्ष

श्रद्धाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे दोन फोटो शेअर केले. यामध्ये ती वनपिस घालून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत तिचा हा अंदाज आवडल्याचं सांगितलं. तर एका चाहत्याने कमेंट करत तिला विचारलं, “लग्न कधी करणार?” चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत श्रद्धाने लिहिलं, “पडोस वाली आंटी रियल आयडी से आओ.”

हेही वाचा : चाहत्याने श्रद्धा कपूरला मराठीतून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कमेंट वाचताच अभिनेत्री म्हणाली…

तर आता श्रद्धाने दिलेलं हे जबरदस्त उत्तर चांगलंच चर्चेत आलं आहे. तिच्या उत्तरावर लाईक आणि कमेंट करत तिचे चाहते तिचा हा दिलखुलासपणा आवडल्याचं सांगत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shraddha kapoor gives reply to fan who asked her about her marriage rnv

First published on: 04-10-2023 at 20:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×