Sushant Sing Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू १४ जून २०२० या दिवशी झाला. त्याने टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात आलं. तसंच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड हादरलं आणि मोठा गदारोळही झाला. सुशांतच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला. अजूनही सुशांत सिंह राजपूतची आठवण नेटकरी, त्याचे चाहते काढत असतात. अशात सुशांतच्या बहिणीने एक दावा केला आहे. सुशांतचा आत्मा त्याच्या मृत्यूनंतर वर्षभर त्रासलेल्या अवस्थेत होता असा दावा सुशांतची बहीण श्वेता सिंहने केला आहे. एका पॉडकॉस्ट मुलाखतीत सुशांतबद्दल अनेक दावे केले आहेत.

श्वेताने म्हटलंय सुशांतचा आत्मा खूप बळ असलेला आहे

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची बहीण श्वेताना बराच कालावधी ध्यानधारणेत घालवला. भाऊ गमावल्याचं दुःख तिला सहन झालं नव्हतं. विपश्यनेपासून ध्यानसाधनेपर्यंत अनेक गोष्टींचा अवलंब करत तिने स्वतःचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. पॉडकास्ट मध्ये श्वेताने सांगितलं, “सुशांतचा आत्मा खूप शुद्ध आणि बळ असलेला आहे. त्याला हवं असेल तेव्हा तो त्याची उपस्थिती जाणवून देऊ शकतो. मी सुशांतला कैलास पर्वतावर पाहिलं. तसंच त्याच्या मृत्यूनंतर वर्षभर त्याच्या आत्म्याला खूप त्रास झाला.” असा दावा श्वेताने केला.

10 Year Old Girl Dies of Cake Due To Artificial Sweetener
१० वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या केकमध्ये ‘हा’ पदार्थ झाला होता जास्त; तुम्हीही व्हा सावध, हे त्रास ओळखा
Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
mentally retarded girl rape marathi news
धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?

हे पण वाचा- अंकिता लोखंडेच्या घरातील सदस्याचं निधन, सुशांत सिंह राजपूतशी होतं खास कनेक्शन, विकी जैन म्हणाला…

सुशांतची बहीण श्वेता सिंहने एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव ‘Pain’ असे आहे. या पुस्तकात तिने तिला आलेले अनुभव, तिची अध्यात्मिक साधना या सगळ्यांवर भाष्य केलं आहे. प्रितिका रावच्या पॉडकास्टमध्ये सुशांतबद्दल तिने भाष्य केलं. सुशांत सध्या कैलास पर्वतावर आहे. तिथून तो सगळ्यांना पहातो. सुशांतच्या आत्म्याकडे मोठी उर्जा आहे. तिथे तो खूश आहे असाही दावा श्वेताने केला आहे. तसंच आपण कधीही कैलास पर्वत पाहिला नाही. पण सुशांतमुळेच तो पाहू शकले असंही तिने म्हटलं आहे.

एअरपॉड सापडल्याचा तो अनुभव

श्वेताने सांगितलं, एकदा तिचं एअरपॉड हरवलं होतं. ती शोधत होती. त्यावेळी तिला सुशांतच्या आत्म्याचा अनुभव आला. मला माझ्या कानांमध्ये सुशांतचा आवाज जाणवला. तुझे एअरपॉड पडद्यामागे आहेत. जा तिथे बघ आणि शोध. मी तिकडे गेले पडदा बाजूला सारला तर एअरपॉड्स खरंच तिथे होते. त्यावर मी म्हटलं भय्या मी तुझं बोलणं ऐकू शकते. हे सगळं काही चकीत करणारं, भीतीदायक आहे. त्यानंतर मला आवाज आला नाही अजिबात घाबरु नको. आत्ता माझ्याकडे माझं शरीर नाही पण मी तुझ्याशी संपर्क करु शकतो. मी तुझ्याशी बोलू शकतो आणि तुला त्याचा धक्का बसायला नको. असा आवाज आल्याचंही श्वेताने सांगितलं आहे. मी तेव्हा कॅलिफोर्नियात होते तेव्हा म्हणजे त्याच्या मृत्यूला दीड वर्ष झाल्यानंतर मला हा अनुभव आला. एवढंच काय मी कारने जाते तेव्हा आपोआप त्याच्या सिनेमातलं गाणं वाजू लागतं. मी आरती किंवा भजन ऐकत असेन तर नमो नमो शंकरा हे गाणं सुरु होतं. त्याचा आत्मा खूप शक्तिशाली आहे. त्याला जर दाखवायचं असेल की मी तुझ्याबरोबर आहे तर अशा गोष्टी घडतात.

मी स्मिता नावाच्या मुलीला भेटले. तिच्या फोनवर सुशांतचा स्क्रिन सेव्हर होता. तो तिने हटवला होता. तर तिला हा अनुभव आला की तिचा स्क्रिनसेव्हर आपोआप बदलला. एकदा सुशांत माझ्या स्वप्नात आला. मला त्याने सांगितलं फार विचार करु नकोस जशी आहेस तशी राहा. फार विचार करु नकोस. मला त्यानंतर मेडिटेशन करताना त्रास झाला नाही. असंही श्वेता सिंहने सांगितलं.