बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रितिक्षित ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं होतं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. अवघ्या काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहे. दीपिका आणि शाहरुखचा पठाण चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यावर विविध प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. त्यावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे.

दीपिका पदुकोण व शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीचा वाद चर्चेत राहिला. त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर आता स्वरा भास्करने भाष्य केले आहे.
आणखी वाचा : Pathaan Trailer Reactions: कसा आहे दीपिका-शाहरुखच्या ‘पठाण’चा ट्रेलर? सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

“मी यापूर्वीही या वादावर माझी प्रतिक्रिया नोंदवली आहे. मला असं वाटतंय की आपल्या देशातील नेत्यांनी अभिनेत्रींच्या कपड्यांवर कमी लक्ष द्यायला हवं. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या कामावर लक्ष दिलं तर फार चांगलं होईल. ज्यामुळे देशाचं भलं होईल”, असे स्वरा भास्करने म्हटले.

आणखी वाचा : “गाणं बरोबर आहे की चुकीचं…”, ‘बेशरम रंग’च्या वादावर स्पष्टच बोलले जावेद अख्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख करत असलेलं काम त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शाहरुखने या चित्रपटासाठी त्याच्या शरीरयष्टीवर अधिकाधिक मेहनत घेतली आहे. तर ट्रेलर पाहिल्यानंतर दीपिकाही या चित्रपटामध्ये भाव खाऊन जाणार अशी चिन्ह दिसत आहेत. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. बहुचर्चित ‘पठाण’ २५ जानेवारीला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कितपत प्रतिसाद मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.