विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटामधून भारतीय शस्त्रज्ञांनी तयार केलेल्या कोरोना व्हॅक्सिनची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटालाही प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतील असं वाटलं होतं. पण तसं चित्र दिसत नाहीये. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपट गृहात खेचण्यासाठी निर्मात्यांनी एक खास ऑफर प्रेक्षकांना दिली आहे.

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपटगृहांमध्ये फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने फक्त ३.५ कोटींची कमाई केली आहे. तर आता प्रेक्षकांना या चित्रपटाकडे वळवण्यासाठी निर्मात्यांनी त्यांना एक खास ऑफर दिली आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vikrant massey
विक्रांत मॅसी- इंडस्ट्रीतला आऊटसायडर ते आम आदमीचा हिरो!

आणखी वाचा : ‘द व्हॅक्सिन वॉर’ पाहून आर माधवनने दिली प्रतिक्रिया, विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटाबद्दल म्हणाला…

विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत नव्या ऑफर ची माहिती दिली. काल रविवार आणि आज गांधी जयंती हे दोन दिवस या चित्रपटाच्या एका तिकिटावर एक तिकीट मोफत देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. यासाठी प्रेक्षकांना ‘बुक माय शो’ या ॲपवरून तिकीट बुक करावं लागेल.

हेही वाचा : “अशा प्रकारच्या कथेची…”, ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनी वेधलं लक्ष, म्हणाले…

दरम्यान, या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक असे अनेक कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.