scorecardresearch

Video : “मला शाहरुखची दुसरी पत्नी बनवा” उर्फी जावेद पुन्हा बरळली

एकीकडे ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे एका अभिनेत्रीने शाहरुखबद्दल वक्तव्य केले आहे.

shahrukh khan urfi javed
शाहरुख खान उर्फी जावेद

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा शाहरुख हा सातत्याने चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. तसेच प्रदर्शनाच्या दिवसापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचताना दिसत आहे. एकीकडे ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे उर्फी जावेदने शाहरुखबद्दल वक्तव्य केले आहे.

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच उर्फी जावेद हिने शाहरुख खानबद्दल भाष्य केले. त्यावेळी तिने ‘पठाण’ चित्रपटाबद्दलही वक्तव्य केलं. नुकतंच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर Voompla यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “अनेक समज” ‘पठाण’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून राम गोपाल वर्मांचे ट्वीट

या व्हिडीओत ती वांद्र्यातील एका ठिकाणी स्पॉट झाली. यावेळी तिने पापाराझींना फोटोसाठी पोज दिली. त्यावेळी तिने शाहरुख खानचे कौतुक केले. यात एका पापाराझींनी तिला शाहरुख खानबद्दल तुला काय वाटते? असा प्रश्न विचारला होता. त्यावर ती म्हणाली, मी बोलून काय होणार आहे, शाहरुख खान असही मला पाहणार नाही.

त्यावर पापराझी म्हणाला, नाही असं कसं. शाहरुख बघेल नक्कीच. त्यानंतर उर्फी म्हणाली, मी शाहरुखवर खूप प्रेम करते. मला शाहरुखची दुसरी पत्नी बनवा. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यावरुन काही लोक तिला ट्रोलही करताना दिसत आहे.

आणखी वाचा : Pathan Box Office Collection : ‘पठाण’ चित्रपटाने मोडला ‘KGF 2’ चा रेकॉर्ड, तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी

दरम्यान बुधवारी २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींचा गल्ला जमवला होता. तर या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३४.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र अद्याप अंतिम आकडे समोर आलेले नाही. तर काही ठिकाणी पठाणने तिसऱ्या दिवशी जवळपास ४१ कोटींची कमाई केल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात १६२ कोटींचा व्यवसाय केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 12:21 IST
ताज्या बातम्या