७० च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री मुमताज खूप लोकप्रिय आहेत. आता त्या चित्रपटांमध्ये काम करत नसल्या तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्या अनेक विषयांवर आपली मतं मांडत असतात. मुमताज सध्या पाकिस्तानला गेल्या आहेत, तिथून त्यांनी काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

मुमताज या व्हिडीओंमध्ये हाउस पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनेक पाकिस्तानी कलाकार दिसत आहेत. त्यांनी पाकिस्तानी गायक गुलाम अली यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actress mumtaz visits pakistan met fawad khan ghulam ali rahat fateh ali khan hrc
First published on: 20-04-2024 at 08:20 IST