बॉलिवूडचे अत्यंत साधे, सरळ आणि संस्कारी दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांवर आजही प्रेक्षक तितकंच प्रेम करतात, नुकतंच सूरज बडजात्या यांनी एका मोठ्या ब्रेकनंतर ‘उंचाई’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून कमबॅक केलं. सुरज बडजात्या यांच्या सगळेच चित्रपट हे कुटुंबाबरोबर बसून पाहण्यासारखेच असतात, परंतु त्यांनीही काही वेगळे विषय हाताळले आहेत. ‘मै प्रेम की दिवानी हूं’सारख्या चित्रपटातून त्यांनी एक हटके लव्हस्टोरी सादर करण्याचा प्रयत्न केला.

‘हम साथ साथ है’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर त्यांनी हा चित्रपट करायचं ठरवलं.हृतिक रोशन, करीना कपूर व अभिषेक बच्चन यांना घेऊन या चित्रपट काढण्यात आला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तसा सपशेल आपटला, बऱ्याच लोकांनी याची खिल्लीही उडवली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक अशी घटना घडली जी कदाचित सुरज बडजात्या यांच्या सेटवर कधीच घडली नसावी. सूरज बडजात्या यांनी चक्क हातातला माइक खाली फेकला अन् ते कलाकारांवर उखडले.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

कायम शांत असणारे मृदु स्वरात लोकांशी बोलणारे सूरज बडजात्या नेमके एवढे का चिडले याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. एका मुलाखतीदरम्यान खुद्द सूरज यांनीच या घटनेबद्दल खुलासा केला होता. सुरज म्हणाले, “मी राकेश रोशन यांच्यासमोर हृतिकला बसवून चित्रपटाची कथा ऐकवली तर अमिताभ बच्चन अन् जया बच्चन यांच्यासमोरच अभिषेकलाही कथा ऐकवली. मी आजवर आयुष्यात कोणाला ओरडलो असेल तर ते अभिषेक बच्चन आणि करीना कपूर आहेत.”

आणखी वाचा : “मला सैन्यात भरती व्हायचं होतं पण…”, नातीच्या पॉडकास्ट शोदरम्यान जया बच्चन यांचा खुलासा

पुढे सुरज म्हणाले, “ते दोघेही सेटवर अजिबात प्रॅक्टिस करत नसत, दोघे प्रचंड धमाल मस्ती करायचे. एकदा त्यांची ही मस्ती पाहून मी वैतागलो आणि हातातला माइक फेकला आणि म्हणालो, मी पहाटे चार वाजल्यापासून वेडा म्हणून जागा आहे का? काही वेळ अभिषेक आणि करीना नाराज होऊन शांत बसले होते पण नंतर पुन्हा त्यांची दंगामस्ती सुरू झाली. नंतर मीदेखील त्याकडे फार लक्ष दिलं नाही, पण हा चित्रपट करताना मला फार मजा आली.”

‘मै प्रेम की दिवानी हूं’ हा चित्रपट १९७६ साली आलेल्या बासु चॅटर्जी यांच्या ‘चितचोर’ या चित्रपटाचा रिमेक होता. सूरज बडजात्या यांच्या करिअरमधला हा पहिला फ्लॉप चित्रपट होता. यानंतर लगेचच सूरज बडजात्या यांनी ‘विवाह’सारखा चित्रपट दिला आणि पुन्हा आपल्या जुन्या स्टाइलच्या चित्रपटांवर लक्षकेंद्रित केलं. सुरज बडजात्या लवकरच आता सलमान खानबरोबर चित्रपट करणार आहेत. याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.