भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गायिकांमध्ये अल्का याज्ञिक यांच्या नावाचा समावेश आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी फक्त भारतीयांचेच नाही तर जगभरातील संगीतप्रेमींची मनं जिंकली आहेत. अल्का फार साधेपणाने आयुष्य जगतात. अल्का आणि त्यांचे पती नीरज कपूर यांना एक मुलगीही आहे. अल्का याज्ञिक यांचा आज वाढदिवस आहे.

स्वरा भास्करने रिसेप्शनमध्ये परिधान केला पाकिस्तानी लेहेंगा, फोटो शेअर करत म्हणाली, “सीमेपलीकडून…”

अल्का यांचा जन्म २० मार्च १९६६ मध्ये कोलकातामध्ये झाला. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या अल्का यांच्या आईही शास्त्रीय संगीत गायिका होत्या. अल्का यांनी लहान वयातच शास्त्रीय गाणं शिकायला सुरुवात केली. ६ व्या वर्षापासून त्यांनी कोलकाता आकाशवाणी आणि ऑल इंडिया रेडिओवर गायला सुरूवात केली होती. १० व्या वर्षी त्या आईसोबत मुंबईत आल्या. त्या लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. राज कपूर यांनी अल्का यांच्या आवाजातील जादू ओळखली आणि त्यांना संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत यांच्याकडे पाठवले. लक्ष्मीकांत यांनाही अल्का यांचा आवाज आवडला. पण त्यावेळी अल्का यांचा आवाज परिपक्व झाला नव्हता, त्यामुळे सिनेमात गाणे गाण्यासाठी त्यांना थोडे थांबावे लागले होते.

ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यावर ढसाढसा रडलेली वनिता खरात; म्हणाली, “तो गेला तेव्हा…”

१९८० मध्ये ‘पायल की झंकार’ सिनेमासाठी त्यांनी आयुष्यातील पहिले सिनेगीत गायले. १९८८ मध्ये माधुरीसाठी ‘तेजाब’ सिनेमातील ‘एक दो तीन’ हे गाणे गायले होते. आजही हे गाणे ऐकले तर त्यांच्या आवाजाची जादू जाणवते. याच दरम्यान त्यांनी ‘कयामत से कयामत तक’ सिनेमासाठी गाणी गायली जी आजही फार ऐकली जातात. ‘खलनायक’ सिनेमात गायलेले ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणे तेव्हा सर्वात जास्त वादग्रस्त गाणे ठरले होते. हे गीत त्यांनी इला अरुणसोबत गायले होते. तसेच ‘ताल’ सिनेमातील त्यांनी गायलेली गाणी ही सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये मोडली जातात.

अल्का आणि त्यांचे पती नीरज यांची ओळख वैष्णोदेवीला जात असताना झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि दोघांनी १९८९ मध्ये लग्न केले. पण ते दोघंही वेगळे राहतात. बऱ्याचदा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही होतात, पण तसं नाही. नीरज व अलका दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. नीरज हे बिझनेसमॅन आहेत आणि ते शिलाँगला राहायचे, तर अलका मुंबईत राहायच्या. दोघेही एकमेकांना भेटायला जात असतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीच्या जन्मानंतर नीरज यांनी मुंबईला शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बिझनेसमध्ये मोठा तोटा झाला. त्यामुळे त्यांनी आधीप्रमाणे वेगवेगळ्या शहरांमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही लग्न केल्यापासून लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सायशा असून तिचं लग्न झालंय.