अक्षय कुमार हा चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कधी त्याच्या नागरिकत्वासाठी तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यामुळे त्याला ट्रोल केले जाते. अक्षय कुमार राजकारणात येणार असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशाच बातम्या समोर येत आहेत. अक्षय कुमार भारतीय जनता पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. त्यापूर्वीच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या जागांसाठी वेगवेगळ्या दावेदारांची नावे समोर येत आहेत. ‘दी लल्लनटॉप’च्या वृत्तानुसार अक्षय कुमारला भाजपने तिकीट दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. तो दिल्लीतील चांदनी चौकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो असंही सांगण्यात येत आहे. भाजप नेते आणि अक्षय कुमार यांच्यात निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.

mahayuti in campaign, Mahavikas Aghadi,
महायुतीतील दिग्गज प्रचारात, तर महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार
Buldhana lok sabha, Buldhana,
बुलढाण्यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचीही अग्निपरीक्षा; मतांचे ध्रुवीकरण, विभाजन ठरणार निर्णायक!
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ

आणखी वाचा : अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी अंबानींनी खर्चे केले तब्बल ‘इतके’ कोटी; वाचून व्हाल थक्क

अद्याप या गोष्टीची पुष्टी ना अक्षय कुमारने केली आहे आणि ना भारतीय जनता पक्षाने यावर अधिकृतरित्या भाष्य केलं आहे. परंतु अक्षय कुमारचे भाजपाबरोबर चांगले संबंध आहेत अन् यामुळेच अक्षयला यावेळी तिकीट मिळू शकतं असंही सांगितलं जात आहे. अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाचे प्रमोशन तेव्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते.

सोशल मीडियावर मात्र सध्या या गोष्टीवर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. याआधीही अक्षयने तो राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कॉमेंट करत अभिनेत्यांनी राजकारणात न पडलेलंच बरं असं म्हणत अक्षयची बाजू घेतली आहे. अक्षयच्या बरोबरीनेच कंगना रणौत हीदेखील यंदा भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. आधीच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये कंगनाने तिच्या राजकीय विचारांबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. अद्याप कंगनानेही या गोष्टीची पुष्टी केलेली नाही.