६५वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा आसामची राजधानी गुवाहाटीत जल्लोषात पार पडला. ऑस्करमधून परत आलेल्या गली बॉय फिल्मफेअरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. तब्बल विविध श्रेणीतील १३ पुरस्कार गली बॉयनं पटकावले. पण, यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा वेगळ्याचं कारणानं चर्चेत आला आहे. पुरस्कारांवर पक्षपातीपणा करण्यात आल्याचा ठपका ठेवतं नेटकऱ्यांनी #BoycottFilmFare अस्त्र उपसले आहे. अनेक चांगले चित्रपट आणि कलाकार पुरस्कारास पात्र असताना त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियातून केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात गली बॉय सिनेमानं १३ पुरस्कार पटकावले. पहिल्यांदाच एकाला चित्रपटाला इतक्या मोठ्या प्रमाणात पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, गली बॉयला मिळालेल्या पुरस्कारावर सिनेचाहत्यांनी आक्षेप घेतला आहे.

सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी #BoycottFilmFare हॅशटॅग ट्रेंड करत आपला संताप व्यक्त केला आहे. केसरी चित्रपटातील गाणं पुरस्कारासाठी पात्र असताना अपना टाईम आयेगा गाण्याला पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार पक्षपाती आणि खऱ्या कलेला डावलणारा आहे. त्यामुळे फिल्मफेअर बंदी घालायला हवी,” अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. हजारो पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. सर्वोकृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी शाहिद कपूर आणि सर्वोकृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी कंगना रनौत नक्कीच पात्र होते, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boycottfilmfare starts trending on twitter bmh
First published on: 17-02-2020 at 14:37 IST