बॉलिवूडची दिवा गर्ल सोनम कपूर कान महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्समध्ये पोहचली आहे. पहिल्या दोन दिवसात दीपिका पदूकोण आणि ऐश्वर्या यांची जादू पाहायला मिळाल्यानंतर सोनमने अनोख्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शनिवारी सोनम साडी नेसून कानच्या कार्यक्रमात आली होती. तिच्या या देशी अंदाजाने सर्वांना थक्क केले. तिची कान महोत्सावातील पहिली झलक अगदीच हटके अशी होती. सोनमच्या या लूकला सध्या चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांशिवाय सोनमचा कथित प्रियकर आनंद आहुजा याला देखील सोनमचा नवा लूक चांगलाच भावला आहे. त्यामुळेच आनंदने इंस्टाग्रामवरुन कान महोत्सवातील सोनमचा लूक शेअर केला आहे.

दीपिका पदूकोण आणि ऐश्वर्या राय बच्चन या सौंदर्यवतींनी महोत्सवाला चार चाँद लावले असताना सोनमने साडी नेसून महोत्सवाला सुरुवात केली. रेड कार्पेटवर ती कोणत्या लूकमध्ये दिसणार याची जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होती.सोनमची बहिण रेखा कपूरने तिच्या सोशल मीडियावरुन सोनमचा लूक शेअर केला असून त्याला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.