करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. या प्राणघातक विषाणूशी दोन हात करण्यासाठी आता सेलिब्रिटी देखील पुढे सरसावले आहे. अनेकांनी आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान अभिनेता ख्रिस इव्हान याने करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी एक नामी शक्कल लढवली आहे. त्याच्यासोबत डेटवर जा आणि करोनाशी लढायला सरकारला मदत करा. अशी एक योजनाच त्याने सुरु केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अॅव्हेंजर्स चित्रपटांमध्ये ‘कॅप्टन अमेरिका’ या सुपहिरोची भूमिका साकारणारा ख्रिस आपल्या चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तो ऑनलाईन डेटिंगमुळे चर्चेत आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना त्याच्यासोबत व्हर्च्युल डेटवर येण्याचे आवाहन केले आहे.

ख्रिसने आपल्या इन्स्टापोस्ट खाली काही लिंक्स दिल्या आहेत. या लिंक्सच्या माध्यमातून तुम्ही त्याला भेटू शकता. या ऑनलाईन डेटिंसाठी त्याला काही पैसे द्यावे लागणार आहेत. डेटिंगमधून जमा होणारे पैसे ख्रिस जागतिक आरोग्य संघटनेला दान करणार आहे. ख्रिसची ही अनोखी अनोखी कल्पना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रयोग अभिनेत्री एमेलिया क्लार्कने देखील केला होता. तिचा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. काही चाहत्यांनी तर तिचे कौतुक देखील केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Captain america chris evans offers virtual hangout for covid 19 charity mppg
First published on: 02-05-2020 at 12:50 IST